Pune Palkhi 2025 : 22 जूनला दिवेघाटाच्या टेकडी परिसरात प्रवेश बंदी; आज पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर 22 जून 2025 रोजी दिवे घाट टेकडी भागात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Palkhi 2025 : संत तुकाराम महाराज आणि माऊली महाराजांच्या पालखी आज पुण्यात मुक्कामी आहे. त्यामुळे पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल (Pune Traffic) करण्यात आले आहेत. पुणे शहरातील प्रमुख 20 रस्ते आज वाहतुकीसाठी बंद असणार आहे. वाहतूक पोलिसांचे 65 अधिकारी तर 1350 कर्मचारी तैनात असणार आहेत. पालखी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी दोन दिवस वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.  

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोड आणि जंगली महाराज रोडवर देखील दुपारनंतर वाहनांना पूर्णपणे बंदी असेल. तर ज्या ठिकाणाहून पालख्या शहरात दाखल होणार त्या सगळ्या मार्गांवर्ती अवजड वाहनांना काल रात्रीपासून प्रवेश बंदी करण्यात आली आहे.  

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Pune Palkhi 2025 Live Tracking : कुठे आहे पालखी? एकाच क्लिकवर करा Track; वाहतुकीचे बदल, पुढचा टप्पा याचीही माहिती मिळणार!

Advertisement

शहरातील या मुख्य रस्त्यांवर वाहतुकीत बदल (Pune Palkhi traffic diversion)

आज सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत रेंजहिल चौक ते संचेती चौक (गणेशखिंड रस्ता), डेक्कन जिमखाना येथील खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता – फर्ग्युसन रस्ता), गाडगीळ पुतळा चौक ते स. गो. बर्वे चौक (छत्रपती शिवाजी रस्ता), आपटे रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता ते टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता (टिळक चौक ते संत कबीर चौक), शनिपार चौक ते सेवासदन चौक, नेहरू चौक ते सोन्या मारुती चौक, गणेश रस्त्यावरील देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक, नेहरू रस्त्यावरील रामाेशी गेट ते पालखी विठोबा मंदिर, संत कबीर चौक ते चाचा हलवाई चौक हे मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

नक्की वाचा - Live Update : भोपखेल फाट्याजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची प्रतीक्षा, पुणे पोलिसांची टीम सज्ज

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर 22 जून 2025 रोजी दिवे घाट टेकडी भागात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. 

दिवे घाट टेकडीवरील बंदीचं कारण काय? (Dive Ghat closed on 22 June )


पुढील काही दिवस हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यात हा भाग निसरडा झाला आहे. या काळात दिवे घाट परिसरात उतारवाटा, निसरडे रस्ते झाले आहेत. लोक मोठ्या संख्येने येथे सेल्फी काढण्यासाठी येत असतात. पुढील अघटित घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात दरड कोसळण्याची भीती असते. मिळालेल्या माहितीनुसार, पालखी २२ जून रोजी दिवे घाट मार्गे सासवडच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. त्यामुळे २२ जून रोजी रात्री १२ ते दुपारी १२ वाजेपर्यंत दिवे घाट टेकडी परिसरात जाण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. 

Topics mentioned in this article