Pune Palkhi 2025: तुकोबाराया अन् माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम कुठे? असं घ्या दर्शन...

Dnyaneshwar Mauli Sant Tukaram Maharaj Palkhi Location: 20 जून आणि 21जून हे दोन दिवस नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात माऊलींची पालखी मुक्कामी असेल. त्यानंतर लोणी काळभोरला मुक्कामासाठी प्रस्थान करेल.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Palkhi Sohala 2025: माऊली... माऊलीचा जयघोष... ज्ञानोबा माऊली-तुकाराम' असा नामघोष.. करत जगतगुरु तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पुण्यामध्ये आगमन झालं आहे. शुक्रवारी सायंकाळी दोन्ही पालख्यांनी पुण्यनगरीत प्रवेश केला. यावेळी लाखो पुणेकरांनी भक्तीचा हा अलौकिक सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. शुक्रवारी आणि शनिवारी दोन्ही दिवस पालख्या पुण्यामध्ये मुक्कामी असतील, त्यानंतर पुढील प्रवासाला रवाना होणार आहेत.

Pune Palkhi 2025 : पालखी मार्गावर सर्व सोयीसुविधा; पुणे जिल्हा परिषदेकडून स्पेशल APP लॉन्च

आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरातून शुक्रवारी पहाटे सहा वाजता तुकाराम महाराज यांच्या पालखीने पुण्याकडे जाण्यासाठी प्रवास सुरु केला होता. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास तुकोबा रायांच्या पालखीचे पुण्यात आगमन झाले. 20 जून आणि 21जून हे दोन दिवस नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात माऊलींची पालखी मुक्कामी असेल. त्यानंतर लोणी काळभोरला मुक्कामासाठी प्रस्थान करेल.

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी शुक्रवारी पहाटे आळंदीतील गांधी वाड्यातून  पुण्याकडे मार्गस्थ झाली. रात्री माऊलींच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन झाले. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिरासमोर माऊलींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत गेले. यावेळी लाखो पुणेकरांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. माऊलींची पालखी भवानी पेठेतील  मंदिरात दोन दिवसांसाठी मुक्कामी असेल.

Advertisement

नक्की वाचा - Pune Palkhi 2025 Live Check : माऊलींची पालखी आज दिवसभरासाठी सासवडमध्येच विसावली, नेमका कुठे मुक्काम?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले माऊलींचे दर्शन..

दरम्यान, पुण्यामध्ये माऊलींच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतले. पुण्यातील भवानी पेठेत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मुख्यमंत्र्यांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांसह पुण्यातील स्थानिक नेते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.