Pune Palkhi 2025 : वर्षभरापासून ज्याची प्रतीक्षा केली जाते ती वारी आता पुण्याहून पुढे सरकली असून (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Live) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने कठी असा दिवेघाट पार करीत सासवडच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. दुसरीकडे (Sant Tukaram Maharaj Palkhi Live) संत तुकाराम महाराजांची पालखी लवकरच लोणी काळभोरहून रवाना होणार आहे. आज या पालखीचा मुक्काम यवत येथे असणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी 18 जून रोजी देहूतून आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 जूनला आळंदीतून निघाल्या आहे. यापुढे केवळ विठ्ठलाचं नाव घेत ते पुढील कित्येक दिवस असाच पायी प्रवास करतील. मनात विठ्ठलाच्या दर्शनाची ज्योत तेवत ठेवत शेवटी 5 जुलै रोजी दोन्ही पालख्या पंढरपुरला पोहोचतील.
Live Update : अहिल्यानगर शहरांमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचं आगमन
अहिल्यानगर शहरांमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचं आगमन झालं असून ही दिंडी अहिल्यानगर शहरांमध्ये दोन देऊन मुक्कामी असते. अहिल्यानगरच्या मार्केट यार्ड या ठिकाणी ही दिंडी दोन दिवस मुक्कामी असून आज जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने गेल्या 40 वर्षांपासून मार्केट यार्ड या ठिकाणी दिंडीतील वारकऱ्यांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत असते. जिल्हा हमाल पंचायतीच्या कामगार महिला या स्वयंपाक बनवत असतात. सुमारे 100 महिला या 50000 वारकऱ्यांचा स्वयंपाक बनवत असतात. आज वारकऱ्यांना आमटी, भात, भाकरी याचा महाप्रसाद असून हमाल पंचायतीच्या सर्व महिलांनी चुलीवर बाजरी आणि ज्वारीच्या भाकरी बनवल्या आहेत.
Live Update : माऊलींच्या पालखीचा उद्याचा मुक्काम जेजुरीला..
माऊलींच्या पालखीचा उद्याचा मुक्काम जेजुरीला..
Live Update : माऊलींची पालखी आज दिवसभरासाठी सासवडमध्येच विसावली, नेमका कुठे मुक्काम?
माऊलींची पालखी काल पुण्याहून रवाना झाली असून काल रात्री सासवडला पोहोचली. दरम्यान दिवेघाटातील तब्बल ३२ किलोमीटरचा रस्ता पार करून पालखी सासवडपर्यंत पोहोचली. घाट चढून जाणं हा प्रवास थकवणारा असतो. त्यामुळे आजही वारकरी विश्रांतीसाठी सासवडला थांबणार आहेत. दरम्यान माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम फलटण तालुक्यातील पवारवाडीजवळ विसावली आहे. आज दिवसभर विश्रांती घेतली जाणार असून उद्या पालखी सासवड ते जेजुरी असा १५ ते १६ किलोमीटरचा टप्पा पार करेल.
Live Update : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शेड्यूल
Live Update : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे शेड्यूल
Live Update : माऊलींची पालखी सासवडहून मार्गस्थ होत आहे...
Live Update : तुकाराम महाराजांची पालखी लवकरच लोणी काळभोरहून रवाना होणार
संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर येथे काल मुक्कामी होती. लवकरच ही पालखी यवतसाठी निघणार आहे. पालखीचा पुढचा मुक्काम यवत येथे असेल.
Live Update : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर यात्रेसाठी अमरावती जिल्ह्यातून 175 बस
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर यात्रेसाठी अमरावती जिल्ह्यातून 175 बस
* गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी २७ अतिरिक्त बसेसचं एसटी महामंडळाकडून नियोजन...
* एक जुलैला दुपारी बारा वाजता अमरावतीतून पंढरपूरसाठी पहिली बस रवाना होणार...
* १ जुलै ते १३ जुलै या काळात अमरावतीतून पंढरपूरसाठी यात्रा स्पेशल बस...
* भाविकांनी ST मंडळाच्या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन...
Live Update : पंढरपूर आषाढी यात्रेसाठी वर्धा एसटी विभाग सज्ज, महामंडळाने केले 75 बसचे नियोजन
रापमच्या वर्धा विभागातून 75 बसेस आषाढी यात्रेसाठी सोडण्यात येणार आहे. भाविकांनीही सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या रापमच्या प्रवासी वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. वर्धा, आर्वी, व हिंगणघाट आगारातून प्रत्येकी 20 बसेस, तळेगाव 6 व पुलगाव आगारातून 9 अशा 75 जादा बसेस सोडण्यात येणार आहे.