3 hours ago

Pune Palkhi 2025 : वर्षभरापासून ज्याची प्रतीक्षा केली जाते ती वारी आता पुण्याहून पुढे सरकली असून (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Live) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने कठी असा दिवेघाट पार करीत सासवडच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. दुसरीकडे (Sant Tukaram Maharaj Palkhi Live) संत तुकाराम महाराजांची पालखी लवकरच लोणी काळभोरहून रवाना होणार आहे. आज या पालखीचा मुक्काम यवत येथे असणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी 18 जून रोजी देहूतून आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 जूनला आळंदीतून निघाल्या आहे. यापुढे केवळ विठ्ठलाचं नाव घेत ते पुढील कित्येक दिवस असाच पायी प्रवास करतील. मनात विठ्ठलाच्या दर्शनाची ज्योत तेवत ठेवत शेवटी 5 जुलै रोजी दोन्ही पालख्या पंढरपुरला पोहोचतील. 

Jun 23, 2025 13:42 (IST)

Live Update : माऊलींच्या पालखीदरम्यान या दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा..

संत तुकाराम महाराज पालखीदरम्यान पावसाचा अंदाज...

बारामती ते इंदापूर मार्गे निमगाव केतकी हा टप्पा २६ ते ३० जूनदरम्यान पार पडणार आहे. यावेळी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, या कालावधीत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर इंदापूर ते पंढरपूर मार्गावरील अकलूज येथे एक ते दोन ठिकाणी हल्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीदरम्यान पावसाचा अंदाज...

सासवड ते वाल्हे मार्गावर उद्या २४ जून रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

त्यानंतर लोणंद ते बरड मार्गावर फलटण या घाट भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. २६ जून ते २९ जूनदरम्यान घाट भागात अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

पालखीच्या चौथ्या टप्प्यात बरड ते वेळापूर या मार्गावर माळशिरस येथे हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

 

Jun 23, 2025 12:21 (IST)

Live Update : अहिल्यानगर शहरांमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचं आगमन

अहिल्यानगर शहरांमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचं आगमन झालं असून ही दिंडी अहिल्यानगर शहरांमध्ये दोन देऊन मुक्कामी असते. अहिल्यानगरच्या मार्केट यार्ड या ठिकाणी ही दिंडी दोन दिवस मुक्कामी असून आज जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने  गेल्या 40 वर्षांपासून मार्केट यार्ड या ठिकाणी दिंडीतील वारकऱ्यांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत असते. जिल्हा हमाल पंचायतीच्या कामगार महिला या स्वयंपाक बनवत असतात. सुमारे 100 महिला या 50000 वारकऱ्यांचा स्वयंपाक बनवत असतात. आज वारकऱ्यांना आमटी, भात, भाकरी याचा महाप्रसाद असून हमाल पंचायतीच्या सर्व महिलांनी चुलीवर बाजरी आणि ज्वारीच्या भाकरी बनवल्या आहेत.

Jun 23, 2025 11:56 (IST)

Live Update : माऊलींच्या पालखीचा उद्याचा मुक्काम जेजुरीला..

माऊलींच्या पालखीचा उद्याचा मुक्काम जेजुरीला..

Jun 23, 2025 08:08 (IST)

Live Update : माऊलींची पालखी आज दिवसभरासाठी सासवडमध्येच विसावली, नेमका कुठे मुक्काम?

माऊलींची पालखी काल पुण्याहून रवाना झाली असून काल रात्री सासवडला पोहोचली. दरम्यान दिवेघाटातील तब्बल ३२ किलोमीटरचा रस्ता पार करून पालखी सासवडपर्यंत पोहोचली. घाट चढून जाणं हा प्रवास थकवणारा असतो. त्यामुळे आजही वारकरी विश्रांतीसाठी सासवडला थांबणार आहेत. दरम्यान माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम फलटण तालुक्यातील पवारवाडीजवळ विसावली आहे. आज दिवसभर विश्रांती घेतली जाणार असून उद्या पालखी सासवड ते जेजुरी असा १५ ते १६ किलोमीटरचा टप्पा पार करेल. 

Advertisement
Jun 23, 2025 07:43 (IST)

Live Update : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शेड्यूल

Jun 23, 2025 07:43 (IST)

Live Update : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे शेड्यूल

Advertisement
Jun 23, 2025 07:41 (IST)

Live Update : माऊलींची पालखी सासवडहून मार्गस्थ होत आहे...

Jun 23, 2025 07:38 (IST)

Live Update : तुकाराम महाराजांची पालखी लवकरच लोणी काळभोरहून रवाना होणार

संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर येथे काल मुक्कामी होती. लवकरच ही पालखी यवतसाठी निघणार आहे. पालखीचा पुढचा मुक्काम यवत येथे असेल. 

Advertisement
Jun 23, 2025 07:35 (IST)

Live Update : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर यात्रेसाठी अमरावती जिल्ह्यातून 175 बस

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर यात्रेसाठी अमरावती जिल्ह्यातून 175 बस

* गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी २७ अतिरिक्त बसेसचं एसटी महामंडळाकडून नियोजन...

* एक जुलैला दुपारी बारा वाजता अमरावतीतून पंढरपूरसाठी पहिली बस रवाना होणार...

* १ जुलै ते १३ जुलै या काळात अमरावतीतून पंढरपूरसाठी यात्रा स्पेशल बस...

* भाविकांनी ST मंडळाच्या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन...

Jun 23, 2025 07:34 (IST)

Live Update : पंढरपूर आषाढी यात्रेसाठी वर्धा एसटी विभाग सज्ज, महामंडळाने केले 75 बसचे नियोजन

रापमच्या वर्धा विभागातून 75 बसेस आषाढी यात्रेसाठी सोडण्यात येणार आहे.  भाविकांनीही सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या रापमच्या प्रवासी वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. वर्धा, आर्वी, व हिंगणघाट आगारातून प्रत्येकी 20 बसेस, तळेगाव 6 व पुलगाव आगारातून 9 अशा 75 जादा बसेस सोडण्यात येणार आहे.