रेवती हिंगवे, पुणे: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. या हल्ल्यानंतर देशातील विविध शहरांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलिसांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात असलेल्या लॉज चालकांना सुरक्षेच्या कारणास्तव महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील लॉजचे मालक- चालक यांची बैठक घेण्यात आली. पुणे पोलिसांच्या परिमंडळ 5 हद्दीतील लॉज मालक- मालक आणि अधिकारी यांची बैठक यांच्यात ही महत्त्वाची बैठक झाली. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव काही नियम आणि सूचना देण्यात आल्या.
लॉजमध्ये राहावयास येणारे परदेशी नागरिकांचे सी फॉर्म भरून त्यांचे पासपोर्ट व व्हिजा यांच्या छायांकित प्रति घेऊन रजिस्टरला नोंद करावी अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. तसेच लॉजच्या प्रवेशद्वारावर व सभोवती येणारे जाणारे रस्ते कव्हर होतील अशा पद्धतीने एचडी व नाईट विजन कॅमेरे बसवण्यात यावेत अशा सुद्धा सूचना पोलिसांनी दिल्यात, त्यासोबतच लॉजमध्ये संशयित इसम आढळून आल्यास तात्काळ पोलीस कंट्रोल रुमला कळवा, असंही पोलिसांनी सांगितले आहे.
(नक्की वाचा- Phule Movie 'मी स्वतः ब्राह्मण, माझ्याएवढा स्ट्राँग...' फुले चित्रपटावर दिग्दर्शकाचा मोठा खुलासा)
दरम्यान, या भ्याड हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु आहे. याचाच भाग म्हणून भारत पाकिस्तानची टपाल सेवा आणि IP ऍड्रेस बंद करण्याच्या विचारात आहे. पाकिस्तानविरोधातील व्यापक राजनयिक मोहिमेचा भाग म्हणून भारत पाकिस्तानातील वेबसाइट्स आणि सेवांवरील प्रवेश रोखण्याचा विचार करत आहे. यात टपाल सेवा आणि IP ऍड्रेसवर बंदी घालण्याचाही समावेश आहे.
लग्नाची वरात थांबवून दगडांचा मारा, वऱ्हाडी रक्तबंबाळ; अकोल्यात राजकारण तापलं!