Pune Porsche Accident Case: आरोपी विशाल अग्रवालविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

जाहिरात
Read Time: 1 min

पिंपरी चिंचवड

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अटकेत असलेला आरोपी विशाल सुरेंद्रकुमार अग्रवालविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये विशाल अग्रवालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ष 2007 साली बांधण्यात आलेल्या हिंजवडीतील नन्सी ब्रह्मा सोसायटीमधील रहिवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

(Terrorist attack on devotees : जम्मू-कश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला, 10 जणांचा मृत्यू)

या सोसायटीमधील 71 फ्लॅट धारकांना पार्किंग, ॲनिमिटी स्पेस आणि अन्य सुविधा देणे बंधनकारक असताना या सुविधा प्रत्येक सोसायटीला न देता तीन सोसायटीला मिळून देण्यात आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

(शेतकऱ्याच्या व्हाट्सअ‍ॅप स्टेटसची कमाल, चोरीला गेलेला बैल सापडला)

सोसायटी धारकांची परवानगी नसताना देखील या बिल्डरने 11 मजली आणि 10 मजली इमारती बांधल्या. त्यामुळे रहिवाशांच्या फिर्यादीवरून विशाल अग्रवाल, रामकुमार अग्रवाल, विनोद कुमार अग्रवाल, नंद कुमार किमतानी आणि आशिष किमतानीविरोधात हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(वाळू चोरांना उपजिल्हाधिकारी हर्षलतांकडून चोप, कराटेचे प्रशिक्षण असे आले कामी)

Pune Car Vandalised:  7-9 मुलांची टोळकी येते आणि वाहनांची तोडफोड करून जाते, पुण्यात चाललंय काय?