यशपाल सोनकांबळे, पुणे:
Pune Railway Station Megablock: पुणे रेल्वे स्थानकावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे स्थानकावर तांत्रिक कामांसाठी रविवारी, १४ जून रोजी नऊ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुणे-दौंड रेल्वे विभागातील महत्त्वाच्या तांत्रिक कामांमुळे ही घोषणा करण्यात आली असून, यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत हा ब्लॉक असल्याने प्रवाशांचे नियोजन विस्कळीत होणार आहे.
Pune News: लोणावळा परिसरात भीती, चिंता अन् धाकधूक! मान्सून आधी मळवली- देवलेवासीय का घाबरले?
पुणे रेल्वे स्थानकावर 9 तासांचा मेगाब्लॉक
याबाबत रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या ब्लॉक दरम्यान इलेक्ट्रिक, सिग्नल, दूरसंचार आणि ओव्हरहेड इक्विपमेंटची तांत्रिक कामे हाती घेतली जाणार आहेत. कामाचा आवाका मोठा असल्याने पुणे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ आणि ४ हे पूर्णपणे बंद राहतील. याचा सर्वाधिक फटका मुंबईकडून, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून येणाऱ्या गाड्यांना बसणार आहे.
या मेगाब्लॉकमुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या अंशतः रद्द करून त्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. रेल्वेने प्रवाशांना विनंती केली आहे की, त्यांनी घरून निघण्यापूर्वी रेल्वेचे सुधारित वेळापत्रक तपासावे. रेल्वेच्या अधिकृत ॲपवर किंवा चौकशी केंद्रावर आपल्या गाडीची स्थिती जाणून घेतल्याशिवाय स्टेशनवर येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
रद्द करण्यात आलेल्या प्रमुख गाड्या
या कामामुळे पुणे, दौंड, बारामती, सातारा, तळेगाव, मुंबई आणि नागपूर दरम्यान चालणाऱ्या अनेक प्रवासी आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
- पुणे-नागपूर एक्स्प्रेस आणि नागपूर-पुणे एक्स्प्रेस
- पुणे-दौंड डेमू (DEMU) आणि बारामती-पुणे डेमू (DEMU)
- सातारा-पुणे डेमू (DEMU)
- पुणे-तळेगाव लोकल सेवा
- सीएसएमटी मुंबई-पुणे आणि पुणे-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world