Pune-Miraj Railway Megablock News : पुणे-मिरज दुहेरीकरणामुळे नीरा यार्ड येथे प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग कामे हाती घेण्यात आली आहेत.पुणे विभागाकडून 5 ते 25 जून या कालावधीत ब्लॉक घेण्यात आला आहे.21 दिवसांच्या ब्लॉकमुळे अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. या महाब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
सातारा व लोणंदपर्यंतच धावणारी डीएमयू गाडी क्रमांक 11426 कोल्हापूर-पुणे डीएमयू 9,16,22 व 23 जून रोजी सातारा येथेच थांबवण्यात येणार आहे. तर या गाडीचा प्रवास 19 व 25 जून रोजी लोणंद येथेच समाप्त होईल. तसच 20475 बिकानेर-मिरज एक्स्प्रेस 15 जून रोजी खडकी येथेच थांबवण्यात येणार आहे. हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस (20669) या गाडीचा प्रवास 19 जून रोजीच समाप्त होईल.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील अलिशान फार्म हाऊसवर रेव्ह पार्टी, 156 जण ताब्यात, 49 तरुणींचा समावेश, कोण होता आयोजक?
मिरज-बिकानेर एक्स्प्रेस 16 जून रोजी खडकी येथून सुटणार
पुण्याऐवजी सातारा व लोणंदवरून सुटणारी गाडी (11425) पुणे कोल्हापूर डीएमयू ही 9 ते 24 जूनदरम्यान वेगवेगळ्या दिवशी सातारा स्थानकावरूनच प्रवास सुरू करणार आहे. 19 व 25 जून रोजी ही गाडी लोणंद येथून सुटेल.20476 मिरज-बिकानेर एक्स्प्रेस 16 जून रोजी खडकी येथून सुटणार असून 20674 पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस 19 जून रोजी सातारा येथून सुटणार आहे.निजामुद्दीन-वास्कोचा (12780) मार्ग बदलला आहे. निजामुद्दीन-वास्को एक्स्प्रेसचा 24 जूनचा प्रवास मनमाड-दौंड-कुर्दुवाडी-मिरज मार्गे वळविण्यात आला आहे.
नक्की वाचा >> Pune News: जेजुरी जवळ असणाऱ्या 'त्या' टोल नाक्यावर 7 गावांतील ग्रामस्थ एकवटले, अवघ्या पुरंदरमध्ये चर्चेला उधाण
कोल्हापूर-पुणे डीएमयू 20 जून रोजी नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा म्हणजे दुपारी 12.50 वाजता सुटेल.मिरज-निजामुद्दीन एक्स्प्रेस 21 जून रोजी 1 तास 15 मिनिटे उशिराने रवाना होणार आहे.तसेच कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेस 25 जून रोजी दोन तास उशिराने म्हणजे दुपारी 4.50 वाजता सुटणार आहे. ब्लॉकच्या कामांमुळे कोल्हापूर-पुणे डीएमयू,बंगळुरू-गांधीधाम,बंगळुरू-एलटीटी,अहमदाबाद-कोल्हापूर,म्हैसूर अजमेर,बंगळुरू-जोधपूर,कोल्हापूर-सीएसएमटी एक्स्प्रेस तसेच कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस या गाड्यांना विविध स्थानकांवर 15 मिनिटांपासून अडीच तासांपर्यंत थांबवण्यात येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world