सुरज कसबे, पिंपरी चिंचवड
Pune Talegaon water sprays VIDEO: पुण्याच्या तळेगावमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तळेगावमधील दाभाडे परिसरात डांबरी रस्त्या मधूनच पाण्याचा प्रचंड मोठा फवारा उसळला. रस्ता दुभंगून पाण्याचा प्रवाह सुरु झाल्याने नागरिक तसेच रस्त्यावरुन येणा- जाणारे वाहन चालकही हादरुन गेले. हा थरारक आणि अचंबित करणारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Mumbai Rain: मुंबईकरांनो लक्ष द्या! वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, समुद्रही खवळणार; BMCचं मोठं आवाहन
रस्ता फुटून पाण्याचा फवारा, नागरिक घाबरले
समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या तळेगाव दाभाडे शहरात विकासकामांचा आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात दीड वर्षांपूर्वी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत रस्त्याखालून नवीन पाईपलाईन टाकून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. पुढील आठवड्यात या योजनेचा शुभारंभ होणार असल्याने नगरपरिषदेकडून शनिवारी नव्या टाकीतून पाणी सोडून पाईपलाईनची चाचणी घेण्यात आली.
मात्र, चाचणी सुरू होताच अचानक डांबरी रस्त्याच्या मधोमध पाण्याचा प्रचंड फवारा उसळला, ज्यामुळे रस्ता फुटल्याचा आभास होऊन स्थानिक नागरिक काही काळ भयभीत झाले. हा संपूर्ण थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. प्राथमिक तपासणीत कंत्राटदाराने दोन पाईप एकमेकांना जोडलेच नसल्याची गंभीर चूक समोर आली आहे.
या पराक्रमामुळे तळेगावच्या विकासकामांच्या दर्जाची पोलखोल झाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दपकेकर यांनी संबंधित कंत्राटदाराकडूनच पाईपलाईनची दुरुस्ती आणि रस्त्याच्या पुनर्बांधणीचा संपूर्ण खर्च वसूल केला जाईल, अशी माहिती दिली आहे.
Mumbai Rain LIVE Blog: शिवाजी पार्कमध्ये महाकाय झाड कोसळलं, वाहतूक ठप्प; वाचा LIVE अपडेट्स