Mumbai Rain Alert: मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने (IMD) आज, 5 जुलै रोजी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. दुपारी ११:३० वाजता जारी करण्यात आलेल्या या 'नाऊकास्ट'नुसार, पुढील तीन तासांत या परिसरांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Mumbai Rain LIVE Blog: शिवाजी पार्कमध्ये महाकाय झाड कोसळलं, वाहतूक ठप्प; वाचा LIVE अपडेट्स
मुंबई महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन
- मुंबई शहर आणि उपनगरीय भागांमध्ये सततच्या पावसामुळे व्यत्यय येत असला तरी, बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा जमिनीवर पूर्णपणे तैनात असून नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत आहे.
- रेल्वे, बेस्ट आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवा सामान्यपणे सुरू असून, मुंबईतील दैनंदिन जीवन कोणत्याही मोठ्या व्यत्ययाशिवाय सुरू आहे.
- भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, ५ जुलै २०२६ रोजी, अतिवृष्टीचा इशारा देत बृहन्मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
- दिवसभरात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
- अधूनमधून ताशी ५५-६५ किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचीही शक्यता आहे. नागरिकांना झाडांखाली आश्रय न घेण्याचा आणि त्यांच्याखाली वाहने उभी न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
- आज दुपारी ३:२२ वाजता ४.१९ मीटर उंचीची भरती अपेक्षित आहे.
- सध्याची हवामानाची परिस्थिती पाहता, नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि केवळ अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सर्व सूचना आणि निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे.
- कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, नागरिकांनी मदतीसाठी तात्काळ बीएमसीच्या १९१६ या आपत्कालीन हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
संपूर्ण बातमी वाचा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world