जाहिरात

Pune News: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मंगेशकर रुग्णालय दोषी! उषा मंगेशकरांसह 11 जणांवर फौजदारी खटला

Tanisha Bhise Death Case Pune: उपचारांविना वेळ गेल्यामुळे तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले, परंतु उपचाराला उशीर झाल्यामुळे त्या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Pune News: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मंगेशकर रुग्णालय दोषी! उषा मंगेशकरांसह 11 जणांवर फौजदारी खटला

Pune Deenanath Mangeshkar Hospital News:  महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच पुण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्तांविरुद्ध फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात रुग्णालय प्रशासनाला दोषी ठरवण्यात आले असून विश्वस्तांविरोधात कारवाईची शिफारस धर्मादाय आयुक्तांनी केली आहे.

 तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात: दिनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी

मागील वर्षी पुण्यामध्ये तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने डिपोझीटसाठी उपचारासाठी विलंब केल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणात न्यायालयाने रुग्णालय प्रशासनाला दोषी ठरवले आहे. रुग्णालयाचे विश्वस्त पंडित हृदयनाथ मंगेशकर, भारती मंगेशकर, उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, डॉ. धनंजय केळकर, डॉ. उल्कांत कुर्लेकर, डॉ. जितेंद्र क्षीरसागर, विधिज्ञ पी. एम. खिरे, सचिन व्यवहारे, आर. पी. जोशी आणि डॉ. प्रसाद राजहंस यांच्यावर फौजदारी कारवाई होणार आहे. 

Ravindra Chavan: रविंद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्याने काँग्रेसचा संताप! माफीची मागणी; लातूरमध्ये निदर्शने

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात तनिषा उर्फ ईश्वरी भिसे या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनामत रक्कम भरली नसल्याच्या कारणावरून रुग्णालयाने तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला. उपचारांविना वेळ गेल्यामुळे तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले, परंतु उपचाराला उशीर झाल्यामुळे त्या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अहवालात काय आहे? 

  • गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात रुग्णालय दोषी आढळले आहे.
  • सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० मधील कलम ४१-(अअ) चे उल्लंघन आणि कलम ६६ (ब) अंतर्गत न्यायालयात खटला भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
  • हा खटला सहधर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक सचिन बाकल यांनी न्यायालयात दाखल केला आहे.
  • दोष सिद्ध झाल्यास संबंधित विश्वस्तांना एक वर्षाचा कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा भोगाव्या लागू शकतात. सध्या हे प्रकरण शिवाजीनगर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

Suresh Kalmadi Passed Away: मोठी बातमी! पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com