Pune Traffic : पुणेकरांनो वाहतुकीचे नियम पाळा! गेल्या 120 दिवसात 3 लाखांहून अधिक वाहन चालकांवर कारवाई

विरुद्ध दिशेने, ट्रिपल सीट, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, तसेच मोबाइलवर संभाषण करणे अशा प्रकारच्या वाहतूक नियमभंगाचे प्रमाण वाढत आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Pune Traffic rule break  : पुण्यात 4 महिन्यांत सव्वा 3 लाख वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरात वाहतूक नियमभंगाचे प्रमाण वाढले आहे. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून गेल्या चार महिन्यांत म्हणजे तब्बल 120 दिवसात सव्वातीन लाख वाहन चालकांवर कारवाई केली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत 75 हजार 713 बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा

यंदा एप्रिल महिना अखेरीपर्यंत तीन लाख 22 हजार जणांवर वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बेशिस्तांवर करण्यात येणाऱ्या कारवाईत पाचपटींनी वाढ झाली आहे.

Advertisement

नक्की वाचा - Pune Spa Centre : पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, बाप-लेकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

विरुद्ध दिशेने, ट्रिपल सीट, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, तसेच मोबाइलवर संभाषण करणे अशा प्रकारच्या वाहतूक नियमभंगाचे प्रमाण वाढत आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत भर पडते. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे.

Topics mentioned in this article