Pune Weather : पुण्यात मार्च महिन्यात गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक तापमान

गेल्या 10 वर्षात मार्चमधील सरासरी तापमानाच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता यंदाची सरासरी तापमानाची नोंद गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक ठरली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Weather : यंदाचा उन्हाळा हा गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक तापदायक ठरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. याची सुरुवात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात उष्णतेची लाट जास्त काळ राहणार असल्याचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान पुण्यात मार्च महिन्यात गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात पुण्यातील हवामान आल्हाददायक असतं. परंतू गेल्या काही वर्षांपासून पुणेकरांना उकाड्याचा फटका सहन करावा लागत आहे. मार्चमध्ये शहरातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिल्याचं स्पष्ट झालं असून गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक सरासरी तापमानाची नोंद झाली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Maharashtra Weather Update: उन्हाळ्याची सुरुवात पावसाने, बुधवारी वादळी वाऱ्यांसह मुंबईत पावसाचा अलर्ट

यंदा मार्चमध्येच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या होत्या. पुणे शहरातील काही भागांमध्ये तापमानाने चाळीशीही ओलांडली. मार्चमध्येही तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्यामुळे उन्हाळ्यातील पुढील तीन महिने नागरिकांना नकोसं होणार असल्याचं दिसतंय. 

Advertisement

पुण्यातील लोहगाव येथे कमाल तापमान 41.4 अंश सेल्सियस नोंदवले गेले होते. तर शिवाजीनगर येथे 30 मार्च रोजी 39 आणि 31 मार्च रोजी 39.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तसेच शिवाजीनगर येथील सरासरी कमाल तापमान 37.6 अंश सेल्सियस राहिले. ते सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सियसने जास्त आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे 1889 पासूनच्या देशभरातील हवामानाच्या नोंदी आहेत. त्यानुसार शिवाजीनगर येथे 28 मार्च 1892 रोजी 42.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. गेल्या 10 वर्षात मार्चमधील सरासरी तापमानाच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता यंदाची सरासरी तापमानाची नोंद गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक ठरली आहे. 

Advertisement