Pune's criminal Nilesh Ghaiwal Attack : कुस्तीच्या आखाड्यातच टाकला डाव, पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळला मारहाण

गुंड निलेश घायवळ याने आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेतच त्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune's gangster Nilesh Ghaiwal Attack : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याला कुस्तीच्या आखाड्यात मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. धाराशिव येथील भूम तालुक्यात कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली होती. आंदरूळ गावातील जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत गुंड निलेश घायवळ याला धक्काबुक्की आणि मारहाण केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे निलेश घायवळ यानेच या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. कुस्ती झाल्यानंतर घायवळ फडात जाऊन पैलवानांची भेट घेत असताना एका पैलवानाने घायवळला धक्काबुक्की केली. यावेळी पैलवानाने घायवळला मारहाण केल्याचंही समजते. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

घायवळला मारहाण झाल्यानंतर आजूबाजूचे लोक त्याच्या मदतीसाठी धावले. घायवळला मारहाण करणारा पैलवान हा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा कुस्तीगीर असल्याची माहिती आहे. घायवळला मारहाण केल्यानंतर त्याच्या समर्थकांनी पैलवानाला चोप दिला. या सर्व प्रकारानंतर मारहाणा पैलवान घटनास्थळावरुन फरार झाला. त्यामुळे पैलवानाने हल्ला का केला, यामागील कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र अशा प्रकारे भर मैदानात गुंड निलेश घायवळ याच्यावर हल्ला झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - UdayanRaje Bhosle : "थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा काढली", उदयनराजेंचे वक्तव्य; ओबीसी नेत्यांची नाराजी


नेमकं काय घडलं? 


सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, मैदानात निलेश घायवळ याच्या स्वागतासाठी हलगी वाजवले जात असल्याचं दिसत आहे. घायवळ आणि कुस्ती स्पर्धेचे आयोजन मैदानातून चालत असताना समोर उभ्या असलेला पैलवान घायवळच्या अंगावर धावून गेला. काही माध्यमांतून घायवळ याला कानशि‍लात लगावण्यात आली आहे. या सर्व प्रकारानंतर आखाड्यात एकच गोंधळ सुरू झाला. काही जणांनी पैलवानाला पकडल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. 

Advertisement