जाहिरात

UdayanRaje Bhosle : "थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा काढली", उदयनराजेंचे वक्तव्य; ओबीसी नेत्यांची नाराजी

UdyanRaje Bhosle on first women school : महात्मा ज्योतिबा फुले यांनी अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो आहे. शिवरायांच्या पश्चात अनेक समाजसुधारकांनी मोठं कार्य केलं त्यापैकी महात्मा ज्योतीबा फुले एक होते, असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटलं.

UdayanRaje Bhosle : "थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा काढली", उदयनराजेंचे वक्तव्य; ओबीसी नेत्यांची नाराजी

रेवती हिंगवे, पुणे

थोरले प्रतापसिंह महाराजांनी सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा काढली, असं वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 198 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी ते पुण्यातील फुलेवाड्या आले होते. तिथे उदयन राजे यांनी हे वक्तव्य केले. उदयनराजेंच्या दाव्यावरुन "महात्मा फुलेंचं महत्व कमी करायचं आणि त्यांच्या पूर्वजांचं महत्व वाढवलं, अशी ओबीसी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले उदयनराजे भोसले? 

सर्वप्रथम स्त्री शिक्षणासाठी शाळा जर कुणी सुरु केली असेल तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली. थोरले प्रतापसिंह महाराजांचं महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनुकरण केलं.प्रतापसिंह महाराजांनी स्वत:च्या राजवाड्यात शाळा सुरु केली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही तिथे प्राथमिक शिक्षण घेतलं.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो आहे. शिवरायांच्या पश्चात अनेक समाजसुधारकांनी मोठं कार्य केलं त्यापैकी महात्मा ज्योतीबा फुले एक होते. महात्मा फुलेंनी आयुष्यभर कष्ट करून संपत्ती गोळा केली, ती समाज सुधारणेसाठी वापरली, असंही उदयनराजेंनी म्हटलं. 

ओबीसी नेत्यांची नाराजी

उदयनराजेंच्या वक्तव्यानंवर ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1948 साली पहिली मुलींची शाळा सुरू केली यावर उदयनराजे यांचा आक्षेप आहे. महात्मा फुलेंचं महत्व कळल्याने उदयनराजे हे फुले वाड्यावर आलेत असं वाटलं होते. मात्र इथे येऊन जयंतीच्या दिवशी फुलेंच महत्व कमी करायचं आणि त्यांच्या पूर्वजांचं महत्व वाढवलंय, असं मंगेश ससाणे यांनी म्हटलं आहे. 

(नक्की वाचा-  Railway News : बदलापूरहून अर्ध्या तासात नवी मुंबई गाठता येणार; रेल्वेच्या नव्या मार्गाला मंजुरी)

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांना अवघा महाराष्ट्र जाणतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिला. महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1948 साली पहिली मुलींची शाळा सुरू केली. यावर उदयनराजे यांचा आक्षेप आहे. त्यांनी नवा शोध लावला आहे. आत्तापर्यंतचे संशोधक, इतिहासतज्ज्ञ फेल ठरलेत, असंही ससाणे यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा- "परतफेड करेन तेव्हा डिलिट करणार", नितशे राणेंना 'तो' व्हिडीओ आजही मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवलाय)

प्रतापसिंह यांनी जी पहिली शाळा सुरू केली त्या शाळेत शिकणाऱ्या मुली कोण होत्या? त्यांचं पुढे काय झालं? परत शाळा का सुरू राहिली नाही? त्यानंतरच्या वंशजांनी आणि उदयनराजे यांनी त्यांचा शैक्षणिक वारसा पुढे का नेला नाही? असे प्रश्न देखील मंगेश ससाणे यांनी उपस्थित केले आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: