
सूरज कसबे
मुंबईपाठोपाठ ॲपलने आपलं अधिकृत स्टोअर पुण्यात सुरू केलं आहे. पुण्यात हे स्टोअर सुरू करण्याचा त्यांचा निर्णय योग्य असल्याचं दिसून येतंय, कारण iPhone 17 लाँच होताच तो खरेदी करण्यासाठी लाँचिंगच्या पहिल्यात दिवशी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जे चित्र मुंबईत पाहायला मिळालं तेच चित्र पुण्यातही पाहायला मिळाले. ॲपलची उत्पादने थेट कंपनीच्या ऑफिशिअल स्टोअरमधून खरेदी करता ये असल्याने इथूनच आयफोन खरेदी करायचा असा पुणेकरांनी निश्चियच केला होता.
नक्की वाचा: SPPU चा मोठा निर्णय! पुणे विद्यापीठाच्या परीक्षा फीमध्ये 20% वाढ, आता थेट पेमेंटचा नवा नियम
पुण्यात iPhone 17 ची किंमत किती आहे?
आयफोन 17 च्या लाँचची क्रेझ विशेषतः तरुणाईमध्ये दिसून आली. सकाळपासूनच या स्टोअरबाहेर रांग लागण्यास सुरूवात झाली होती, ज्यात तरूण अधिक दिसत होते. या रांगेत व्यावसायिक आणि तंत्रज्ञानप्रेमीही होते. केवळ नवीन फोन खरेदी करणे हाच उद्देश नव्हता, तर ॲपलच्या उत्पादनांचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी त्यांनी ही गर्दी केली होती. आयफोन 17 सिरीजमध्ये तीन मॉडेल्स उपलब्ध आहेत. आयफोन 17, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स. या मॉडेल्सची किंमत अंदाजे ₹90,000 पासून सुरू होते.
नक्की वाचा: "मी मुस्लीम आहे तरीही…", आयफोन खरेदीनंतर तरुणाची प्रतिक्रिया चर्चेत
iPhone 17 ची खासियत काय आहे ?
नवीन आयफोन 17 मध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. यात A19 बायोनिक चिपसेटचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे फोनचा परफॉर्मन्स पूर्वीपेक्षा कैकपटीने वेगवान झाला आहे. नवीन ‘डायनॅमिक आयलंड' फीचर युजरला एक स्मार्ट अनुभव मिळण्यास मदत होते . या व्यतिरिक्त, 50-मेगापिक्सलच्या मेन कॅमेऱ्यामुळे कमी प्रकाशातही फार सुंदर फोटो काढता येतात. तर 'आयफोन 17 प्रो' आणि 'आयफोन 17 प्रो मॅक्स' मॉडेल्समध्ये 'प्रोमोशन डिस्प्ले' तंत्रज्ञान आणि एक खास 'पेरिस्कोप लेन्स' देण्यात आली आहे. फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीची आवड असणाऱ्यांना हा फोन एक पर्वणी ठरतोय. यासोबतच, iPhone 17 च्या बॅटरीच्या क्षमतेतही वाढ करण्यात आली असून, नवीन टायटेनियम बॉडीमुळे फोन अधिक मजबूत आणि वजनाने हलका आहे. हे नवे फीचर्स आणि डिझाइनच ग्राहकांच्या आकर्षणाचे मुख्य कारण ठरले आहे. पुण्यात कोपा मॉल इथे Apple Store सुरू झाले असून हे स्टोअर दिसते कसे हे पाहण्यासाठीही काही जण इथे आल्याचे सांगण्यात आले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world