जाहिरात

Purandar Airport: पुरंदर विमानतळ प्रकल्पाला बुस्टर डोस! सरकारने तिजोरी उघडली, शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी थेट..

पुरंदर विमानतळाच्या भुसंपादनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला 6,000 कोटी रुपयांच्या कर्जाची हमी देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. 

Purandar Airport: पुरंदर विमानतळ प्रकल्पाला बुस्टर डोस! सरकारने तिजोरी उघडली, शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी थेट..

यशपाल सोनकांबळे, पुणे: 

Purandar Airport News:  पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाबाबत एक अत्यंत महत्त्वाची अन् मोठी अपडेट समोर आली आहे. पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादनाला मोठी चालना देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुरंदर विमानतळाच्या भुसंपादनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला 6,000 कोटी रुपयांच्या कर्जाची हमी देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. 

E-KYC Deadline: राज्यभरातील शिक्षकांसाठी महत्त्वाचं! E-KYCबाबत सर्वात मोठी अपडेट; एप्रिलचा पगार मिळणार का?

पुरंदर विमानतळाच्या कामाला बुस्टर डोस!

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) ६,००० कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यासाठी राज्य सरकारने अधिकृतपणे शासन हमी  दिली आहे. या निर्णयामुळे  कागदावरच असलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्ष कृती आराखड्यात येण्याची चिन्हे आहेत.

​फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या कर्ज प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे उद्योग विभागाचा २७ फेब्रुवारीचा जुना निर्णय रद्द करून, आता वित्त विभागाने सुधारित शासन निर्णय जारी केला आहे. या कर्ज हमीची मुदत १२ महिन्यांची असेल. एमआयडीसी आता हुडको (HUDCO) किंवा इतर नामांकित वित्तीय संस्थांकडून स्पर्धात्मक व्याजदराने हे कर्ज घेऊ शकणार आहे.

शेतकऱ्यांचा मोबदला अन् पुनर्वसनासाठी वापर 

प्रशासकीय स्तरावर या प्रक्रियेला वेग देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुरंदर विमानतळासाठी सुमारे २,८०० ते ३,००० हेक्टर जमिनीचे संपादन होणे अपेक्षित आहे. जमिनीच्या बदल्यात शेतकऱ्यांना देण्यात येणारा मोबदला आणि पुनर्वसन यांसाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. लोहगाव विमानतळाची मर्यादित क्षमता पाहता, पुण्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी पुरंदर विमानतळ अत्यंत कळीचा मुद्दा मानला जात आहे.

Sangli News: वाचवायला धावला, दोघांचाही जीव गेला, 2 शाळकरी मुलांच्या मृत्यूने सांगलीत हळहळ

Listen to the latest songs, only on JioSaavn.com