Purandar Airport: ठरलं तर! पुरंदर विमानतळ मोबदल्याबाबत मोठी अपडेट, शेतकऱ्यांसाठी काय झाला निर्णय?

Purandar Airport News: आता भूसंपादनाच्या दर निश्चितचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत सोमवारी शेतकरी आणि जिल्हा प्रशासनाची महत्त्वाची बैठक होणार आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Purandar International Airport compensation News: पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी केले जाणाऱ्या भूसंपादनासाठी उद्योग विभागाकडून आवश्यक असणारी परवानगी प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता भूसंपादनाच्या दर निश्चितचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत सोमवारी शेतकरी आणि जिल्हा प्रशासनाची महत्त्वाची बैठक होणार आहे. 

उद्योग विभागाकडून मान्यता

समोर आलेल्या माहितीनुसार, पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन केले जाणार आहे. या भूसंपादनासाठी देण्यात येणाऱ्या मोबदल्याच्या रकमेचा सर्व अहवाल राज्य सरकारकडे पाठवला होता. या अहवालाला मान्यता देऊन राज्य सरकारने तो उद्योग विभागाकडे पाठवला. आता जिल्हा प्रशासनाने दिलेल्या या प्रस्तावाला उद्योग विभागानेही मान्यता दिली आहे. 

Purandar Airport Pune: शेतकरी मालामाल! पुरंदर विमानतळासाठी एकरी 'इतके' कोटी मिळणार, आणखी काय मिळणार फायदे?

उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी अनबलगन यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेत याबाबत चर्चा केली. त्यानंतर या अहवालाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कायद्यातील कलमानुसार आवश्यक असलेली उद्योग विभागाची मान्यता मिळाली आहे. या मान्यतेमुळे आता जमिनीच्या दरासंदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

सोमवारी होणार महत्त्वाचा निर्णय

आता भूसंपादनाचा दर निश्चित करण्यासाठी सोमवारी बैठक बोलावण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित असतील. शेतकऱ्यांसोबत चर्चा करुन दर निश्चित करण्यात येणार आहे. दर निश्चित झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डुडी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

Advertisement

दरम्यान, या विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील 1 हजार 285 हेक्टर म्हणजेच जवळपास तीन हजार एकर जमीन संपादन करण्यात येणार आहे.  जिल्हाधिकारी हुडी यांनी स्पष्ट केले की, शासनाच्या २०१३ च्या भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसाहत अधिनियमातील तरतुदीनुसार उचित भरपाई, पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यावर भर दिला जात आहे.

Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी जमीन, शेतकऱ्यांनी प्रती एकर 1 कोटी नाही तर मागितले 'इतके' कोटी