जाहिरात

Purandar Airport Pune: शेतकरी मालामाल! पुरंदर विमानतळासाठी एकरी 'इतके' कोटी मिळणार, आणखी काय मिळणार फायदे?

Pune Purandar Airport Compensation For Land Acquisition: पुनर्वसाहत अधिनियमातील तरतुदीनुसार उचित भरपाई, पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यावर भर दिला जात आहे.

Purandar Airport Pune: शेतकरी मालामाल! पुरंदर विमानतळासाठी एकरी 'इतके' कोटी मिळणार, आणखी काय मिळणार फायदे?

Purandar International Airport compensation News: पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने महत्त्वपूर्ण आणि शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी भूसंपादन झालेल्या सात गावांतील शेतकरी प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावाची माहिती दिली, ज्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. (Pune Purandar Airport News)

शेतकऱ्यांना काय काय सुविधा मिळणार? Purandar International Airport compensation

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  संपादित जमिनीवरील घर, गोठा, फळझाडे, विहिरी, बोअरवेल आणि जलवाहिन्या यांसारख्या मालमत्तेच्या मूल्याच्या दुप्पट मोबदला तसेच, १० टक्के विकसित भूखंड शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी हुडी यांनी स्पष्ट केले की, शासनाच्या २०१३ च्या भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसाहत अधिनियमातील तरतुदीनुसार उचित भरपाई, पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यावर भर दिला जात आहे.

प्रतिएकर एक कोटी मिळणार

 जिल्हाधिकारी हुडी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून, शासकीय नियमांनुसार भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना प्रतिएकर एक कोटी रुपयांचा मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. संपादित जमिनीच्या क्षेत्राच्या १० टक्के एवढा विकसित भूखंड औद्योगिक, वाणिज्यिक, निवासी किंवा संमिश्र प्रयोजनासाठी त्याच क्षेत्रात वाटप करण्यात येणार आहे. हा भूखंड किमान १०० चौरस मीटरचा असेल, याची हमी प्रशासनाने दिली आहे.

Pune News: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प अडचणीत! 4285 कोटींच्या प्रकल्पाला ब्रेक लागणार? काय आहे कारण?

शेतकऱ्यांना मिळणार 'हे' इतर फायदे!

ज्या प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे घर संपादित झाले आहे, त्यांना 'एरोसिटी' मध्ये २५० चौरस मीटरचा निवासी भूखंड मोबदला दराने दिला जाईल. भूमिहीन होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना ७६० दिवसांच्या किमान कृषी मजुरीइतकी रोख रक्कम त्रैमासिक हप्त्यांमध्ये दिली जाईल. अल्पभूधारक प्रकल्पग्रस्तांना ५०० दिवसांच्या कृषी मजुरीएवढी रक्कम मिळेल. घर संपादन झालेल्या कुटुंबांना ४० हजार रुपये स्थलांतर अनुदान आणि प्रति गोठा ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाईल. 

तसेच प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका सदस्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (ITI) एका अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देऊन पात्रतेनुसार नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे. जिल्हाधिकारी हुडी यांनी 'नियमांच्या चौकटीत राहून शेतकऱ्यांना अधिकाधिक न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे,' असे स्पष्ट केले. या निर्णयामुळे पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.

Pune Accident CCTV Footage: पुण्यात भीषण अपघात.. दोन भावांचा मृत्यू, कारचे तुकडे, हादरवणारा VIDEO

Listen to the latest songs, only on JioSaavn.com