Farmer Loan : शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहिरनाम्यातच? राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्टीकरण...

विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मोठ्या यशानंतर महायुतीचं सरकार सत्तेत आलं. त्यानंतरही महायुतीनं जाहिरनाम्यात दिलेल्या काही आश्वासनांवर अद्याप संभ्रम आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
शिर्डी:

सुनील दवंगे, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मोठ्या यशानंतर महायुतीचं सरकार सत्तेत आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. फडणवीस सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर आता चार महिन्यांचा कालावधी उलटलाय. त्यानंतरही महायुतीनं जाहिरनाम्यात दिलेल्या काही आश्वासनांवर अद्याप संभ्रम आहे.

लाडक्या बहिणींना दर महिना मिळाणारी 1500 ची रक्कम 2100 करण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं. आता ही रक्कम नव्या निकषांसह लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मिळणार असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यातील आर्थिक अस्थिरतेचं कारण देत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं शक्य नसल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. अजित पवार यांच्या या भूमिकेला छेद देणारी भूमिका जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली आहे. 

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारच्या जाहिरनाम्यात आहे. सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार नाही, असं कधीही म्हंटलेलं नाही. जाहिरनाम्यात दिलेला शब्द आम्ही पूर्ण करु असं विखे-पाटील यांनी स्पष्ट केलं. 

Advertisement

राज्य सरकारचा कालावधी पाच वर्षांचा आहे. जाहिरनाम्यात दिलेला शब्द पूर्ण करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे, असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. 

( नक्की वाचा : Shirdi News : शिर्डीतील 'त्या' लोकांवर बहिष्कार टाका! पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे थेट आदेश )

वडेट्टीवारांना टोला

'मी गुढी उभारत नाही,' असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. विखे-पाटील यांनी त्यावरही टीका केली आहे. छत्रपती संभाजी महाराज आपलं दैवत आहे मात्र देश पातळीवर प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी काहा लोक अवमान करतात. त्यांना संभाजी महाराजांच बलिदान समजलेल नसल्यानं ते असे वक्तव्य करत असतात, अशी टीका त्यांनी वडेट्टीवार यांच्यावर केली. 
 

Topics mentioned in this article