Rahuri Election: राहुरीत पुन्हा कमळ फुललं! अक्षय कर्डिलेंचा मोठ्या मताधिक्क्याने विजय

ज्यांनी मदत केली मी त्यांना कधी विसरू शकत नाही. यत्या काळात सर्वांना मदत करणार अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या विजयासह भाजपने आपला गडही राखला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनील दवंगे, अहिल्यानगर:

Rahuri Bypoll Election Result:  नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर स्पष्ट झाला असून, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर भाजपने अक्षय कर्डिले यांच्यावर विश्वास टाकला होता. त्यांनी तब्बल १ लाखांहून अधिक मताधिक्य घेत विरोधकांचा दारूण पराभव केला.

Baramati Result: सुनेत्रा पवारांनी इतिहास रचला! बारामतीत रेकॉर्डब्रेक मतांनी विजय; 22 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

अक्षय कर्डिलेंचा मोठा विजय, राहुलीत मोठा विजय 

शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले हे महायुतीचे उमेदवार होते. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे वंचितचे संतोष चोळके आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे यांचे आव्हान होते. मात्र कर्डिले यांनी मतमोजणीत पहिल्या फेरीपासून आघाडी घेत विरोधकांचा सुपडा साफ केला.  

Advertisement

​ सकाळी कडक बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण २७ फेऱ्यांमध्ये पार पडलेल्या या प्रक्रियेत पहिल्या फेरीपासूनच अक्षय कर्डिले यांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्याशी त्यांची मुख्य लढत अपेक्षित होती, मात्र निकालाच्या कौलाने सर्व अंदाज फोल ठरवले. कर्डिले यांनी घेतलेली ही लाखांची आघाडी राजकीय विश्लेषकांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे.

दरम्यान, या दमदार विजयानंतर अक्षय कर्डिले यांनी भावुक प्रतिक्रिया दिली. दरम्यान, आज माझे वडील असते तर खूप आनंद झाला असता. मला ज्यांनी ज्यांनी मदत केली मी त्यांना कधी विसरू शकत नाही. यत्या काळात सर्वांना मदत करणार अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या विजयासह भाजपने आपला गडही राखला आहे. 

Baramati- Rahuri Election Result LIVE: सुनेत्रा पवारांनी अजित पवारांचा विक्रम मोडला; मोठ्या विजयाकडे वाटचाल