Raigad News: शिवसेनेला 'त्या' धोरणाचा मोठा फटका! रायगड जिल्हा परिषदेत जुन्या संघर्षातून नवी युती

Raigad Zilla Parishad Election: रायगड जिल्हा परिषदेच्या राजकारणात सध्या मोठ्या उलथापालथी होत आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर आता सत्तास्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Raigad News: रायगड जिल्हा परिषदेच्या रणांगणात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही
रायगड:

प्रसाद पाटील, प्रतिनिधी

Raigad Zilla Parishad Election: रायगड जिल्हा परिषदेच्या राजकारणात सध्या मोठ्या उलथापालथी होत आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर आता सत्तास्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला (शिंदे गट) सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचे स्पष्ट संकेत दिले असून, तसे झाल्यास शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागू शकते.

बहुमताचा आकडा आणि गोव्यातील त्या फोटोची चर्चा

रायगड जिल्हा परिषदेच्या रणांगणात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती झाल्यास सत्तेचा मार्ग सुकर होणार आहे. भाजपला 15 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 16 जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही पक्षांची एकत्रित संख्या 31 होत असून, सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला जादुई आकडा गाठण्यासाठी ही संख्या पुरेशी आहे. 

याच दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा गोव्यातील एक एकत्रित फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या फोटोत राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील, सुनील तटकरे, आमदार रवी पाटील, सतीश धारप आणि वैकुंठ पाटील यांच्यासह सर्व विजयी उमेदवार एकत्र दिसत असल्याने युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.

( नक्की वाचा : Raigad News : मंत्र्यांचा मुलगा आरोपी, अन् तपास करणाऱ्या पोलिसाचा आत्महत्येचा इशारा; महाडमध्ये काय घडतंय? )
 

शिवसेनेच्या मार्गात अडथळा

निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटाने एकला चलो रे ची भूमिका घेत 40 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 21 जागांवर विजय मिळवून शिवसेना जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. असे असूनही, सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ गाठण्यात त्यांना अपयश आले आहे. 

Advertisement

दुसरीकडे, राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्रित निवडणूक लढवली होती, त्यामुळे निकालांनंतरही हे दोन्ही पक्ष नैसर्गिक मित्र म्हणून सत्तेत एकत्र येताना दिसत आहेत. शिवसेनेला सोबत घेण्यास दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते फारसे अनुकूल नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

( नक्की वाचा : KDMC News: कल्याण डोंबिवलीत महापौरांची निवड होऊनही महापालिका 'रामभरोसे'? भाजपा नगरसेवकाच्या एका प्रश्नाने खळबळ )

जिल्ह्यातील जुना संघर्ष आणि वरिष्ठ पातळीवरील निर्णय

गेल्या काही वर्षांपासून रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार विरुद्ध राष्ट्रवादीचे सुनील तटकरे असा संघर्ष सातत्याने पाहायला मिळाला आहे. हा स्थानिक वाद आता सत्तास्थापनेच्या आड येत असल्याचे बोलले जाते. सध्या दोन्ही बाजूंच्या स्थानिक नेत्यांनी सत्तास्थापनेचा अंतिम निर्णय वरिष्ठ घेतील अशी अधिकृत भूमिका मांडली असली तरी, प्रत्यक्ष जमिनीवरील हालचाली मात्र राष्ट्रवादी-भाजप युतीकडेच झुकलेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते यावर काय शिक्कामोर्तब करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement