Pune News : सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे नागरिकांची दाणादाण झाली आहे. दरम्यान पुण्यातही हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून पुण्याला यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
आज २२ एप्रिल रोजी पुणे जिल्ह्यासाठी येल्लो अलर्ट देण्यात आला असून पुढील ३ तासांत अहिल्यानगर, धाराशिव, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची तसेच ३०-४० किमी प्रति तास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. वरील माहिती सचेत अँपवरुन घेण्यात आली आहे. दरम्यान पुढील तीन तासात घराबाहेर पडणार असाल तर छत्री सोबत ठेवा. याशिवाय अहिल्यावर, धाराशिव, पुणे, सातारा या जिल्ह्यांनाही पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
Advertisement
बातमी अपडेट होत आहे.
Topics mentioned in this article