मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीला जाणार आहेत. त्यांचा दिल्ली दौरा निश्चित झाला असून या दौऱ्याची तारीखही ठरली आहे. 4 डिसेंबर रोजी राज ठाकरे दुपारी दिल्लीला निघणार आहेत. ते दोन दिवस दिल्लीतच असणार आहेत अशी माहिती मिळते आहे. राज ठाकरे हे सहकुटुंब दिल्लीला जात असल्याची माहिती मिळते आहे. या दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांची कोणकोणत्या नेत्यांशी गाठभेठ होते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
नक्की वाचा: प्रवाशांचे हाल, इंडिगोचं 'वर्क रोस्टर' कुठे बिघडलं? विमानतळावर मोठी गर्दी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा कशासाठी आहे ?
पुढील दोन दिवस मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीत तअसणार आहेत. आज दुपारी ते दिल्लीसाठी निघणार असून ते सहकुटुंब दिल्लीला जाणार आहे. अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांच्या भावाचे म्हणजेच डॉ.राहुल बोरुडे याचे लग्न ठरले आहे. हा विवाहसोहळा दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. या विवाहसोहळ्यासाठी राज ठाकरे दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळते आहे. 5 डिसेंबरला राहुल बोरूडे यांचे लग्न आहे.
नक्की वाचा: अमरावती-मुंबई विमानसेवा 15 दिवसांसाठी बंद, कारण काय?
काँग्रेसचे दिग्विजय सिंह उद्धव ठाकरेंच्या भेटीला
काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री दिग्विजय सिंह हे मुंबईत आले असून ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसेने युती करायचे जवळपास निश्चित केल्याचे दिसते आहे. मात्र मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढावी असे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. दिग्विजय सिंह हे नेमके कुठल्या कारणासाठी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आले आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही.