जाहिरात

Indigo Flights : प्रवाशांचे हाल, इंडिगोचं 'वर्क रोस्टर' कुठे बिघडलं? विमानतळावर मोठी गर्दी

Indigo Flights: आज सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी इंडिगोने शेकडो उड्डाणं रद्द केली आहेत. पायलटांच्या कमतरतेमुळे संपूर्ण विमानसेवेला फटका सहन करावा लागत आहे.

Indigo Flights : प्रवाशांचे हाल, इंडिगोचं 'वर्क रोस्टर' कुठे बिघडलं? विमानतळावर मोठी गर्दी
  • इंडिगो एयरलाइन्स की उड़ानों में नए फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन नियमों का वजह से पायलटों की भारी कमी हुई है.
  • दो दिनों में केवल 35% फ्लाइट्स ही समय पर उड़ सकीं जबकि प्रतिदिन 2000 से अधिक उड़ानें संचालित होती है.
  • नवंबर में इंडिगो की 1200 से अधिक उड़ानें रद्द हुईं जिनमें से अधिकांश क्रू और नए नियमों की वजह से रद्द की गईं .
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी दिल्ली:

Indigo Flights: भारतातील मोठी विमानसेवा इंडिगो एअरलाइन्स सध्या मोठ्या अडचणींचा सामना करीत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी इंडिगोने शेकडो उड्डाणं रद्द केली आहेत. पायलटांच्या कमतरतेमुळे संपूर्ण विमानसेवेला फटका सहन करावा लागत आहे. दिल्ली, मुंबई, हैद्राबादसह इतर शहरांमध्ये विमानसेवा विस्कळीत झाली आहे. हजारो प्रवासी विमानतळांवर अडकून पडले आहेत.  गुरुवारी सकाळी दिल्लीहून निघालेल्या इंडिगोच्या ३० हून अधिक विमानसेवा रद्द करण्यात आल्या. हैदराबादमध्येही सुमारे ३३ विमानसेवा रद्द करण्यात आल्या. मुंबई विमानतळावरही अनेक विमानसेवा रद्द करण्यात आल्या. यापूर्वी, मंगळवार आणि बुधवारी, देशभरातील प्रमुख विमानतळांवर अनेक विमानसेवा उशिराने सुरू झाल्या आणि काही रद्दही करण्यात आल्या. यामुळे हजारो प्रवासी विमानतळांवर अडकले, टर्मिनल्सवर लांब रांगा लागल्या आहे. अचानक विमानसेवा का विस्कळीत झाली याबद्दल प्रश्न उपस्थित झाले.

सरकारी आकड्यांनुसार, २ डिसेंबरला इंडिगोची केवळ ३५ टक्के उड्डाणं वेळेवर टेकऑफ घेऊ शकली. सर्वसाधारणरणे दररोज इंडिगोची २,२०० विमानं उड्डाणं करतात. बुधवारी ३ डिसेंबर रोजी परिस्थिती बिघडली आणि दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरूसह अनेक विमानतळांवर दुपारी साधारण २०० हून अधिक उड्डाणं रद्द करावी लागली. 

Amravati to Mumbai Flight : अमरावती-मुंबई विमानसेवा 15 दिवसांसाठी बंद, कारण काय?

नक्की वाचा - Amravati to Mumbai Flight : अमरावती-मुंबई विमानसेवा 15 दिवसांसाठी बंद, कारण काय?

एफडीटीएल काय आहे? 

इंडिगो विमानसेवा गेल्या महिन्यापासून लागू झालेल्या नव्या फ्लाइट ड्यूटी टाइन लिमिटेशन नियमांनंतर पायलटची संख्या कमी होत आहे. भारतात, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) सारख्या नियामक संस्था फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) लागू करतात. फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशनअंतर्गत फ्लाइटचे किमान तास, ड्युटी कालावधी आणि किमान विश्रांतीची आवश्यकता सेट करून कर्मचाऱ्यांचा थकवा टाळण्यासाठी 'वर्क रोस्टर' डिझाइन केलं आहे. या नव्या नियमांमुळे फ्लाइट क्रू सदस्यांना ऑपरेशन दरम्यान सुरक्षितता आणि कार्यक्षमता राखण्यासाठी पुरेशी विश्रांती मिळेल.

वेळेत उड्डाण करणं ही इंडिगोची ओळख आहे. त्याची ओटीपी ३५ टक्क्यांपर्यंत घसरली आहे.  स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांच्या आत इंडिगोची ३०० हून अधिक विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. तर अनेक उड्डाणं ७ ते ८ तास उशीराने धावत आहे. 

इंडिगोने सांगितलं की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही पुढील ४८ तासांसाठी उड्डाण शेड्यूलमध्ये काही बदल केले आहेत. प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी टीम सातत्याने काम करीत आहे. ज्या प्रवाशांची विमानं रद्द झाली आहेत, त्यांना नव्या विमानाची व्यवस्था करून दिली जाईल, याशिवाय रिफंड करण्यात येणार आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com