Hindi Controversy: राज- उद्धव ठाकरेंचा मुंबईत 5 जुलैला एकत्र मोर्चा, हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधु एकटवले!

हिंदीविरोधात राज ठाकरे- उद्धव ठाकरे यांचा एकच विराट मोर्चा निघेल असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Raj Thackeray Uddhav Thackeray Morcha: राज्य सरकारने केलेल्या हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज ठाकरे यांनी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. याचबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून हिंदीविरोधात राज ठाकरे- उद्धव ठाकरे यांचा एकच विराट मोर्चा निघेल असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

इयत्ता पहिलीपासून केलेल्या हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधुंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारची कानउघडणी करत या निर्णयाविरोधात विराट मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 5 जुलै रोजी राज ठाकरे यांचा मोर्चा निघणार आहे. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांचा 7 जुलै रोजी मोर्चा निघणार आहे. अशातच आता हे दोन्ही मोर्चे एकाच दिवशी निघणार असल्याची मोठी घोषणा संजय राऊत यांनी केले आहे. 

Advertisement

जय महाराष्ट्र! "महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल. ठाकरे हेच ब्रँड आहेत!" असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. तसेच या ट्वीटसोबत संजय राऊत यांनी ठाकरे बंधुंचा एकत्रित फोटोही पोस्ट केला आहे. त्यामुळेच आता या मराठी भाषेसाठी एकवटणाऱ्या ठाकरे बंधुंचे आगामी काळात मनोमिलन होणार का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.