मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा (Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava) आज एकत्रित मेळावा होणार आहे. ठाकरे बंधूंचा विजय मेळावा उद्या वरळी डोममध्ये पार पडणार आहे. सध्या या ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे. मेळाव्याला सुरुवात होण्यापूर्वी संजय राऊत (Marathi Language News) यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान जय गुजरात म्हणाले होते. यावर शिंदेंनी माफी मागावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. यापुढे (Sanjay Raut on Marathi) ते म्हणाले, गुजरातच्या बांधवांनी महाराष्ट्रात अनेक विकासकामं केली, पण त्यांनी यातून पैसे कमावले नाही का? त्यांनी संपत्ती कमावली नाही का? असा सवालही उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, ही मुंबई मराठी माणसांच्या, मजुराच्या रक्तातून आणि घामातून उभी राहिली आहे.
संजय राऊत म्हणाले...
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील सर्वात कच्च मडकं
दोन्ही भावांनी जनतेला दिशा दाखवावी अशी अपेक्षा
कार्यक्रमात महाराष्ट्राचं राज्यगीत वाजवलं जाईल
'कार्यक्रमात मराठी संस्कृतीचं दर्शन घडवलं जाईल'