
Gujrat Valsad Rakshabandhan Emotional Story: बहीण भावाच्या नात्याला पवित्र धाग्यात बांधणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण आपल्या भाऊरायाला राखी बांधते अन् त्याच्याकडून आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन घेते. देशभरात रक्षाबंधनचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अशातच गुजरातमध्ये एक काळजाला चटका लावणारा राखी बंधनाचा सोहळा पार पडला. जो वाचून तुमचेही डोळे पाणावतील. नेमकं काय घडलं? जाणून घ्या...
गुजरातमधील वलसाड येथे एक सुंदर तीथल बीच रोड आहे. येथे रक्षाबंधनाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पाहणारे लोक भावूक झाले. सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण हा रक्षाबंधन काहीतरी वेगळा होता. एका बहिणीचा मृत्यू झाला पण तिच्या हातांनी तिच्या मोठ्या भावाला राखी बांधली. राखी बांधणाऱ्या भावासाठी हा क्षण सर्वात भावनिक होता. तो आपले अश्रूही रोखू शकला नाही.
राखीचा धागा म्हणजे प्रेमाचा अतूट विश्वास! भाऊबहिणीला पाठवा खास मेसेज
समोर आलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या वलसाड येथे सुंदर तीथल बीचवर एक अनोखा रक्षाबंधन सोहळा पार पडला. हा सोहळा सर्वांच्याच मनाला चटका लावून जाणारा होता. कारण ज्या बहिणीचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला होता तिच्याच हातांनी भावाने राखी बांधून घेतली. हे कसं घडलं? जाणून घेतल्यानंतर तुमचेही डोळे पाणावतील.
वलसाड येथे राहणाऱ्या रिया मिस्त्री या मुलीचे सप्टेंबर 2024 मध्ये निधन झाले. मात्र तिचा छोटा उजवा हात आजही जिवंत आहे. कारण तिचा उजवा हात मुंबईच्या अनमता अहमदला प्रत्यारोपित केला आहे. मृत मुलगी रियाला १५ सप्टेंबर रोजी सुरतमधील किरण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे तिला ब्रेन हॅमरेज झाल्याचे निदान झाले. त्यातच तिचा मृत्यू झाला. रियाच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांनी रियाचे मूत्रपिंड, यकृत, एक हात, फुफ्फुसे आणि कॉर्निया काढून इतर रुग्णांना हस्तांतरित करण्यात आले.
रियाचा हाच दान केलेला हात मुंबईची अनमता अहमद हिच्यावर प्रत्यारोपित केला गेला. अनमता ही उत्तर प्रदेशातील अलीगड येथील एका नातेवाईकाच्या घरी होती. ती टेरेसवर खेळत असताना तिला विजेचा धक्का बसला. ज्यामध्ये तिचा उजवा हात खांद्यापासून कापावा लागला. त्यानंतर मुंबईतील एका रुग्णालयाने तिला रियाचा हात बसवला.
Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला 95 वर्षानंतर जुळून आलाय अनोखा योग, जाणून घ्या तिथी आणि मुहूर्त
अनमता ही जगातील सर्वात लहान मुलगी आहे जिचा खांद्यापर्यंत हात प्रत्यारोपित झाला आहे. अनमताला रियाचा हात बसवला गेला तेव्हा तिचे कुटुंबीय प्रचंड भावुक झाले. यामुळेच ही दोन्ही कुटुंबे दोन्ही कुटुंबे प्रेम, दुःख आणि कृतज्ञतेच्या बंधनात बांधली गेली होती. त्यानंतर आज रक्षाबंधनादिवशी ही दोन्ही कुटुंबे एकत्र आली. अनमताने रियाच्याच हाताने तिचा भाऊ शिवमला राखी बांधली. विशेष म्हणजे अनमता तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तिला भाऊ नव्हता पण आता शिवमच्या रुपाने तिला एक भाऊही मिळाला. काळजाला चटका लावणाऱ्या हा रक्षाबंधनावेळी सर्वांचेच डोळे पाणावल्याचे पाहायला मिळाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world