जाहिरात

Happy Raksha Bandhan 2025 Wishes: राखीचा धागा म्हणजे प्रेमाचा अतूट विश्वास! भाऊबहिणीला पाठवा खास मेसेज

Happy Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधन सणानिमित्त भाऊबहिणीला खास शुभेच्छा संदेश पाठवा.

Happy Raksha Bandhan 2025 Wishes: राखीचा धागा म्हणजे प्रेमाचा अतूट विश्वास! भाऊबहिणीला पाठवा खास मेसेज
"Happy Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा!"

Happy Raksha Bandhan 2025 Wishes And Quotes: भाऊबहिणीमधील प्रेमाचे नाते अधिक मजबूत करणारा सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan 2025). या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करते, भाऊराया देखील ताईच्या रक्षणाचे वचन देतो. आताच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा भाऊ-बहीण एकत्र नसतात, पण अंतर कितीही असलं तरी ते या मजबूत नात्याच्या आड कधीही येऊ शकत नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधन सणानिमित्त दिवशी एक सुंदर आणि मनापासून दिलेला संदेश तुमच्या ताई दादा नक्की पाठवा.  

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा (Raksha Bandhan 2025 Best Wishes In Marathi)

1. रक्षाबंधनाच्या या शुभदिनी तुला मनःपूर्वक शुभेच्छा! 
तुझं आयुष्य आनंदाने भरलेले असो 
प्रत्येक क्षण तुझ्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा असो
तुझे रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, ती मी आयुष्यभर निभावीन
तू नेहमी माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहेस
रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Raksha Bandhan 2025!

2. आज राखी बांधताना डोळ्यांत अश्रू आणि हृदयात अभिमान आहे  
कारण तू माझा भाऊ आहेस
तुला यश, आरोग्य आणि सुखद आयुष्य लाभो हीच सदिच्छा
नेहमी असेच प्रेम राहू दे आपल्या नात्यात
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

3. राखी पौर्णिमेच्या या पवित्र बंधनाच्या दिवशी मी देवाकडे प्रार्थना करते 
तू नेहमी यशस्वी, निरोगी आणि आनंदी राहो 
तुला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

4. राखीच्या धाग्याइतके मजबूत आणि निरंतर असो आपलं नातं
तुझ्या प्रत्येक यशात मी तुझा अभिमान बाळगतो 
तुझ्या स्वप्नांना यश मिळो आणि तू नेहमी हसत राहो
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
Happy Raksha Bandhan 2025!

5.  रक्षाबंधनाचा हा सण फक्त राखीचा नाही तर भावनेचा आहे 
तुला माझ्या जीवनातील आधार मानते 
तुझे आरोग्य उत्तम राहो आणि यश तुझ्या पावलाशी खेळो 
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

6.  तू लहान आहेस पण तुझे मन खूप मोठंय 
तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो
तुझे हसणे कायम असेच राहो 
तुला जीवनात कधीही दु:खाचा स्पर्श होऊ नये 
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

7. तू नेहमी मला आधार दिलास
मार्गदर्शन केले आणि धीर दिलास 
या रक्षाबंधनाच्या दिवशी तुला धन्यवाद देते 
आणि तुझे आयुष्य यशस्वी-सुंदर व्हावे ही प्रार्थना करते
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

8. तू नसतीस तर आयुष्यातील अनेक क्षण अपूर्ण राहिले असते 
तुझे हसणे, चिडचिड, काळजी सर्व काही खूप आठवते 
रक्षाबंधनाचा हा सण आपल्या नात्यातील प्रेम अधिक दृढ करो हीच इच्छा 
Happy Raksha Bandhan 2025!

9. यंदा राखी तुला प्रत्यक्ष बांधता येत नाही
पण मनाने मी नेहमी तुझ्याजवळ आहे 
तुझे यश, तुझे आरोग्य आणि तुझा आनंद 
यासाठी मी रोज प्रार्थना करते
लवकर भेटूया! रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
Happy Raksha Bandhan 2025!

10. तू केवळ बहीण नाहीस
तर आईसारखी काळजी घेणारी, शिक्षिका आणि मैत्रीणही आहेस 
तुझे प्रेम माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा खजिना आहे
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

रक्षाबंधनाचे खास मेसेज २०२५ (Raksha Bandhan 2025 Special Messages In Marathi)

1. राखीचा पवित्र धागा बांधतेस तू
प्रेमाचे बंधन आठवतेस तू
दूर असूनही जवळ असतेच कायम
माझ्या आयुष्याची प्रेरणा वाटतेस
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई
Happy Raksha Bandhan 2025!

2. तुझे हसणे, माझे सुख 
तुझे रडणे, माझे दुःख
तुझ्यासारखी बहीण आहेस म्हणूनच
हे आयुष्य सुंदर आहे सुंदर 

3. लहानपणाची ती राखी 
आईच्या हातातील मिठाई 
भांडणं, राग आणि पुन्हा मिठी 
अगदी स्वप्नात सुद्धा जपतेस तू मला ताई 

4. रक्षाबंधनाच्या दिवशी देतो वचन 
जगाच्या शेवटापर्यंत तुझे रक्षण
फक्त बहीण नाहीस तू माझी
तर देवाने पाठवलेली कृपा आहेस खरी 
Happy Raksha Bandhan 2025!

5. एक धागा, अनेक भावना 
एक वचन, अनेक आठवणी 
राखी म्हणजे नात्याचं संजीवन 
भाऊ-बहिणीचं प्रेम म्हणजे जीवन
Happy Raksha Bandhan 2025!

6. भाऊबहिणीचे नाते हे खास 
जरी असतो कधी थोडासा त्रास 
तरी प्रेमाचे हे नाते असते गोड 
जगात कुठेही मिळणार नाही असा जोड

7. बहीण म्हणजे हसणे
कधी कधी रडणं
पण कुठेही गेले तरी
माझ्या मनात सतत घुटमळणे

8. रक्षाबंधनाच्या दिवशी आठवतो लहानपण
भांडणे, गोडीगुलाबी आणि खोडसाळपण 
आज तू दूर आहेस खरे... 
पण मनात मात्र अगदी जवळ आहेस गं!
Happy Raksha Bandhan 2025!

9. तुझ्या हातात राखीची भावबंदगाठ 
माझ्या मनात रक्षणाची साथ 
हा धागा फक्त धागा नाही 
तो प्रेमाचे पवित्र वचन आहे ताई!

10. रक्षाबंधनाची आठवण आली 
तुझी गोड हाक आठवली
भावा म्हणताच तू जवळ यायची
हसत हसत मिठीत सामावायची 
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Raksha Bandhan 2025!

रक्षाबंधन सणाचे खास व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस मेसेज (Raksha Bandhan 2025 WhatsApp Status)

1. राखी म्हणजे नात्यातील एक हळवा स्पर्श 
भावा-बहिणीच्या प्रेमाचे नाजूक बंधन
Happy Rakhi Purnima 2025!

2. आज रक्षाबंधनाचा सण…
प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचे बंधन पुन्हा मजबूत होण्याचा दिवस!  
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

3. भावाबहिणीचे नाते म्हणजे
कधी भांडण, कधी हसणं पण कायमचं सोबत असणे 
Happy Raksha Bandhan 2025!

4. तुझे रक्षण करणे हेच माझे कर्तव्य आणि अभिमान!
Happy Raksha Bandhan 2025 बहीण!  

5. भाऊबहिणीचा सण म्हणजे प्रेम 
जिथे शब्द कमी पडतात आणि भावना बोलतात 
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

6. राखीचा धागा म्हणजे प्रेमाचा अतूट विश्वास!
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा! 
Happy Raksha Bandhan 2025!

7. भाऊ आणि बहिणीचे नाते
सर्वात गोड आणि निस्सीम प्रेमाचे उदाहरण! 

8. भांडतो खूप… पण प्रेम मात्र मनापासून असते
Happy Rakhi 2025!  

9.  राखीचा प्रत्येक धागा 
एक आठवण… एक हक्क… एक पक्के नाते
Happy Raksha Bandhan 2025! 

10. ती लहानपणाची रक्षाबंधन अजून आठवते 
आईच्या पदराआड लपलेली बहीण आणि मी तिला वचन देणारा
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com