3 days ago

आज श्रीरामनवमीच्या निमित्ताने देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला रामजन्मोत्सवानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. 

Apr 06, 2025 17:01 (IST)

Nagpur News: नागपूरमध्ये शोभायात्रेचा उत्साह! CM देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींची उपस्थिती

रामनवमीच्या निमित्ताने रविवारी श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा पोद्दारेश्वर मंदिरातून निघेल आणि मोमीनपुरा, हंसापुरी, इतवारी, महाल अशा भागातून मार्गक्रमण करेल.

ही शोभायात्रा गेल्या 59 वर्षांपासून काढली जाते. यंदा 17 मार्चच्या हिंसाचारानंतर हेच संवेदनशील भाग यात्रेच्या मार्गात आहेत. त्यामुळे, राममंदिर समितीनं शांतता समितीच्या बैठकांद्वारे दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींना एकत्र आणून शांततेत यात्रा पार पाडण्याचं नियोजन केलं आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, 5 हजार पोलीस आणि ड्रोनच्या नजरेखाली यात्रा पार पडेल.

Apr 06, 2025 15:55 (IST)

Nagpur Accident: नागपूरमध्ये भीषण अपघात, 3- 4 जण जखमी

- नागपूर शहरातील मानकापूर ते वाडी मार्गावरती पलोटी नगर परिसरात गोरेवाडा बायपास रिंग रोडवर दोन ट्रक कारच्या भीषण अपघात 

- हा अपघात इतका भीषण आहे की रस्त्या लगतचा टपरीच्या भागत कार घुसली, या कारमध्ये तीन ते चार प्रवाशी असल्याची माहिती आहे..

- एक ट्रक रस्त्याच्या दुभाजकावर आदळला आहे.. गिट्टीखदान पोलीस घटनास्थळी दाखल होऊन जखमीना उपचारासाठी हलवल्याची माहिती आहे..

- एका ट्रकचा समोरच भाग पूर्णतः कारवार असल्याचं दृष्यांमध्ये दिसत आहे...

- कार पूर्णतः चेंदामेद झाल्यानं कारमधील लोकांना गंभीर परिस्थिती असल्याची माहिती समोर येत आहे...

Apr 06, 2025 15:54 (IST)

Pune News: मोठी बातमी! पुण्यात 5 मेपर्यंत ड्रोन उडवण्यास बंदी

5 मे पर्यंत पुणे शहरात ड्रोन उडवण्यास बंदी

पुणे शहर पोलिसांच्या वतीने आदेश जारी

आजपासून 5 मे पर्यंत आदेश राहणार जारी

ड्रोन सह रिमोट कंट्रोल लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लिडिंग, हॉट एयर बलून याच्या वापरावर सुद्धा प्रतिबंधात्मक आदेश लागू

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाणार

Apr 06, 2025 13:38 (IST)

Live Update : लातूरचे मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची प्रकृती स्थिर;पहाटेच्या वेळी केलेली शस्त्रक्रिया यशस्वी

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी काल रात्री गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे..त्यामध्ये बाबासाहेब मनोहरे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत..बाबासाहेब मनोहरे यांच्या उजव्या बाजूने डोक्यात गोळी आरपार गेली आहे.कवटीच्या हाडाचे तुकडे मेंदूमध्ये आढळून आले होते. त्यावर पहाटेच्या वेळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आणि यशस्वी झाली आहे.ते सध्या आमच्या उपचाराला प्रतिसाद देत आहेत आणि त्यांची प्रकृतीत सुधारणा होत आहे.येत्या 48 तास ते आमच्या निगराणीखाली असणार आहेत. अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटलच्या संचालक डॉक्टर हनुमंत किनीकर यांनी दिली आहे. 

Advertisement
Apr 06, 2025 12:07 (IST)

Live Update : राम जन्मला! अयोध्येत रामलल्लाच्या माथ्यावर सूर्याभिषेक

Live Update : राम जन्मला! अयोध्येत रामलल्लाच्या माथ्यावर सूर्याभिषेक 

Apr 06, 2025 11:49 (IST)

Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोहरादेवी दौरा रद्द..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोहरादेवी दौरा रद्द..

रामनवमी निमित्त पोहरादेवी येथे करणार होते पूजा....

हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने दौरा रद्द झाल्याची सूत्रांची माहिती.....

इतर मंत्री मात्र राहणार उपस्थित....

अमृता फडणवीस उपस्थित राहणार नाहीत

Advertisement
Apr 06, 2025 10:53 (IST)

Live Update : पुणे महापालिकेकडून 344 खेळाडूंना शिष्यवृत्ती

पुणे महापालिकेकडून 344 खेळाडूंना शिष्यवृत्ती

पुणे शहरातील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 344 खेळाडूंना पुणे महापालिकेकडून शिष्यवृत्ती 

महापालिकेच्या सुधारित क्रीडा धोरण 2018 अंतर्गत देण्यात येणार शिष्यवृत्ती

यासाठी महापालिकेला एकूण 87 लाख 20 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असून, या प्रस्तावास नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

पुणे महानगरपालिकेच्या शिष्यवृत्तीसाठी आत्तापर्यंत एकूण 743 अर्ज प्राप्त झाले असून या अर्जांची छाननी करून 344 खेळाडूंना पात्र ठरवण्यात आले आहे.

Apr 06, 2025 09:33 (IST)

Live Update : रामनवमी उत्सवात आमदार सुरेश धस यांनी वाजवला ढोल

बीडच्या आष्टी तालुक्यातील श्रीरामाचे दादेगाव येथे पुरातन श्रीराम प्रभूचे मंदिर आहे. या मंदिरात श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई यांच्या गंडकी शिळापासून बनवलेल्या मूर्ती आहेत. समर्थ रामदास स्वामी यांच्या शुभहस्ते या मंदिराची स्थापना झाली असून दरवर्षीप्रमाणे यंदा देखील, श्रीराम नवमीचा उत्सव उत्साहात साजरा होत आहे. या उत्साहात सहभागी होऊन, पालखीचे दर्शन घेतल्यानंतर, आमदार सुरेश धस यांना ढोल वाजण्याचा मोह आवरला नाही..अन् त्यांनी यावेळी मोठ्या उत्साहात ढोल वाजवीत आनंद साजरा केला

Advertisement
Apr 06, 2025 08:52 (IST)

Live Update : आज भाजपचा 46वा स्थापना दिवस, नागपुरात नवीन कार्यालयाचे भूमिपूजन

रामनवमीला भाजपचा 46 वा स्थापना दिवस असून या मुहूर्तावर पक्षाच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन

नागपूर शहरात एका आमदारापासून सुरुवात केलेल्या भारतीय जनता पक्षाचे आज चार आमदार आहेत. त्यापैकी एक राज्याचा मुख्यमंत्री आहे. खासदार भाजपचा आहे. ते केंद्रात मंत्री आहे. प्रदेश भाजप अध्यक्ष सुध्दा जिल्ह्यातील आहेत. आज रामनवमीला भाजपचा 46 वा स्थापना दिवस असून या मुहुर्तावर पक्षाच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन होत आहे.  देशभराप्रमाणे नागपुरातील भाजपचा आलेख चढताच राहिला आहे. दरम्यान या प्रसंगी भारतीय जनता पक्ष नागपूर महानगर आणि नागपूर ग्रामीण कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.

Apr 06, 2025 07:20 (IST)

Live Update : औरंगजेबाच्या शिरावर पाय ठेवून उभे राहिलेले छत्रपती संभाजी महाराज असा अनोखा पुतळा तयार

राज्य सर्वत्र रामनवमी उत्साहात साजरी होत असून अहिल्यानगर शहरात देखील राम नवमीनिमित्त शोभ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे... मात्र छावा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन चरित्र सर्वांच्या समोर आले असून शोभयात्रेसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यांची मागणी वाढली आहे. अहिल्यानगर शहराजवळ असणाऱ्या कल्याण रोड या ठिकाणी शिल्पकार विकास कांबळे यांनी औरंगजेबाच्या डोक्यावर  पाय दिलेल्या छत्रपती संभाजी राजांची एक वेगळी मूर्ती साकारली आहे.... ही मूर्ती आज रामनवमीच्या शोभयात्रेमध्ये  दाखल होणार आहे.

Apr 06, 2025 07:19 (IST)

Live Update : उन्हाळ्यात लिंबांची मोठी मागणी असल्याने लिंबाच्या बागेतून चोरीचं प्रमाण वाढलं

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातल्या बांबरुड शिवारात लिंबूच्या बागेतून लिंबूची चोरी होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. उन्हाळ्यात लिंबांची मोठी मागणी असल्याने बागेतून लिंबांची चोरी होत असल्याने शेतकऱ्यांनी पाळत ठेवत बागेतून लिंबू चोरणाऱ्या दोन संशयितांपैकी एका संशयितास पकडून थेट भडगाव पोलीस स्टेशन गाठत संशयित आला पोलिसांच्या ताब्यात दिले. तर दुसरा संशयित मात्र हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे. दरम्यान लिंबू चोरी करणाऱ्या संस्थेचा विरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.