Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्त्वाचं! रामनवमीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल, 'हे' रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

पुणे शहरातही विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रामनवमी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांमुळे पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Traffic Update: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्सहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सवानिमित्त मंदिरे गर्दीने फुलून गेली असून शहरांमध्ये मिरवणुका, मोठ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहरातही विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रामनवमी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांमुळे पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. 

प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सवानिमित्त पुणे शहरात विविध धार्मिक आणि राजकीय संघटनांच्या वतीने भव्य मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकांमुळे शहराच्या मध्यभागासह लष्कर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक व्यवस्थेत व्यापक बदल करण्यात आले आहेत. उद्या दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत बाजीराव रस्ता आणि लष्कर परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद किंवा वळवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली आहे.

Advertisement

Chandrashekhar Bawankule: मुंबईतील 30 लाख नागरिकांसाठी गुडन्यूज! महसूलमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

बाजीराव रस्ता बंद! 

शहरातील मुख्य मानला जाणारा बाजीराव रस्ता मिरवणुकीच्या काळात वाहतुकीसाठी बंद असेल. पुरम चौकातून शिवाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. ही वाहतूक टिळक रस्ता, अलका टॉकीज चौक आणि खंडोजी बाबा चौक मार्गे वळवण्यात येईल.

लष्कर आणि छावणी परिसर:
लष्कर भागातील एम.जी. रोड आणि परिसरातील अंतर्गत रस्त्यांवरही निर्बंध असतील. वाय जंक्शन येथील वाहतूक बंद करून ती १५ ऑगस्ट चौकातून वळवण्यात येईल. तसेच महंमद रफी चौकाकडून येणारी वाहने ईस्ट स्ट्रीट मार्गे मार्गस्थ होतील. कोहिनूर हॉटेल परिसरातील वाहतूक भोपळे चौकाकडे वळवण्यात आली आहे.

भोसरी चाकण परिसरातही महत्त्वाचा रस्ता बंद! 

भोसरीतील हरिओम स्वीट चौक ते भोसरी ओव्हरब्रिज हा मार्ग बंद राहील. विदर्भ मित्र मंडळ आणि आळंदी रोड हा पर्यायी मार्ग असेल. चाकणमध्ये आंबेठाण चौक आणि मार्केट यार्ड परिसरातील रस्ते बंद असून, वाहनचालकांनी मेदनकरवाडी आणि शिक्रापूर रोडचा वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Pune News : पुण्यातील 'या' महिलेची शहरभर होतेय चर्चा, जे कोणालाच जमलं नाही ते धगधगत्या उन्हात करून दाखवलं

Topics mentioned in this article