Nagpur News : चहा 7 रुपये, कार्यकर्त्यांचे मानधन...; नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 'दरपत्रक' निश्चित

आगामी 15 जानेवारी रोजी होणाऱ्या नागपूर महानगरपालिका (NMC) निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना, निवडणूक प्रशासनाने उमेदवारांच्या प्रत्येक खर्चावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी एक सविस्तर 'दरपत्रक' (Schedule of Rates) जाहीर केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आगामी 15 जानेवारी रोजी होणाऱ्या नागपूर महानगरपालिका (NMC) निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना, निवडणूक प्रशासनाने उमेदवारांच्या प्रत्येक खर्चावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी एक सविस्तर 'दरपत्रक' (Schedule of Rates) जाहीर केले आहे. यामध्ये चहाच्या कपापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येक गोष्टीची किंमत ठरवून देण्यात आली आहे. 

महापालिका निवडणुकीत वॉर्ड स्तरावर अनेकदा अनधिकृतपणे मोठा खर्च केला जातो. जेवण, नाश्ता किंवा रोख रकमेचा वापर करून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रकार रोखण्यासाठी आणि निवडणुकीत पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक हालचालीला 'किंमत' लावून दिली आहे. 15 लाख रुपयांची मर्यादा ओलांडली गेल्यास उमेदवारावर कडक कारवाई होऊ शकते.

राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन महापालिका ए दर्जाच्या आहेत. त्यांच्याकरीता राज्य निवडणूक आयोगाने यावर्षी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा 4 लाख रुपयांवरून (2017 मधील मर्यादा) थेट 15 लाख रुपये केली आहे. ही वाढ तब्बल 275% इतकी आहे. खर्चाची मर्यादा वाढल्यामुळे पैशांचा गैरवापर होऊ नये, खर्चाची लपवालपवी होऊ नये या उद्देशाने अधिक कडक पावले उचलण्यात आली आहेत.

Advertisement

नक्की वाचा - Maharashtra Politics: अजित पवार गट रेशीमबागेत का जात नाही? कधीपासून सुरु झाली प्रथा? वाचा...

निश्चित केलेले काही महत्त्वाचे दर:

1. खाद्यपदार्थ आणि पेये:
निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांना किंवा मतदारांना दिल्या जाणाऱ्या नाश्ता आणि जेवणाचे दर निश्चित करण्यात आले आहेत:

चहा: 7 रुपये प्रति कप.
कॉफी: 13 रुपये प्रति कप.
लस्सी किंवा शीतपेय: 22 रुपये.
नाश्ता: 30 रुपये प्रति व्यक्ती.
शाकाहारी जेवण (Lunch/Dinner):112 रुपये प्रति व्यक्ती.
मांसाहारी जेवण: 224 रुपये प्रति व्यक्ती.

प्रचार साहित्य आणि पायाभूत सुविधा:

लाऊडस्पीकर सिस्टीम (अँप्लीफायरसह): पहिल्या दिवसासाठी 2890 रुपये.
जनरेटर ( 3 ते 10 KVA): 5,000 रुपयांहून अधिक प्रति दिवस.

याशिवाय मंडप (पेंडॉल), व्यासपीठ, खुर्च्या, लायटिंग, पंखे आणि कार्पेट यांचेही दर निश्चित केले आहेत. यामुळे छोट्या कोपरा सभांचा खर्चही आता उमेदवाराच्या हिशोबात अधिकृतपणे जोडला जाणार आहे.

Advertisement

मानधन आणि मजुरी :

कार्यकर्ते: 392 रुपये प्रति व्यक्ती, प्रति दिवस.
ड्रायव्हर: 504 रुपये प्रति दिवस.

निगराणी कशी ठेवली जाणार?

स्वतंत्र बँक खाते: प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीच्या व्यवहारांसाठी एक स्वतंत्र बँक खाते उघडणे अनिवार्य आहे.

विशेष पथके: महानगरपालिकेने प्रत्येक झोनमध्ये 'विशेष खर्च संनियंत्रण पथके' (Zonal Expenditure Monitoring Teams) तैनात केली आहेत. यामध्ये लेखा अधिकारी आणि सहाय्यक लेखा अधिकारी यांचा समावेश असेल.

दैनिक अहवाल: उमेदवारांना त्यांच्या दैनंदिन खर्चाचा अहवाल या पथकांकडे नियमितपणे सादर करावा लागेल.