Ratnagiri News: 5 रुपयांच्या नोटेचा नाद नडला; लाखोंच्या आमिषाने रत्नागिरीतील वृद्धाला 9 लाखांचा गंडा

Ratnagiri Cyber Fraud: रत्नागिरीतील भाटमिऱ्या येथील एका वृद्धाला 5 रुपयांच्या जुन्या नोटेवर 15 लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून 9 लाख रुपयांना गंडा घातला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ratnagiri Cyber Fraud Elderly Man
AI Image

राकेश गुडेकर, रत्नागिरी

जुन्या दुर्मिळ नोटा आणि नाणी विकून लाखो रुपये मिळवण्याच्या नादात अनेकजण सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. रत्नागिरीतील भाटमिऱ्या परिसरात राहणाऱ्या हेमंत मारुती शिवलकर या वृद्धाला अशाच एका 'ट्रॅक्टर' असलेल्या 5 रुपयांच्या नोटेचे आमिष दाखवून तब्बल 9 लाख 21 हजार रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

फेसबुक रिल्सवरून रचलं जाळं

या फसवणुकीची सुरुवात फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून झाली. उत्तर प्रदेशातील अमित चव्हाण नावाच्या संशयिताने फेसबुकवर रिल्स बनवून '5 रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरचे चित्र असल्यास 15 लाख रुपये मिळतील' अशी जाहिरात केली होती. हे रिल्स पाहून शिवलकर यांनी आरोपीशी संपर्क साधला आणि आपल्याकडे अशी नोट असल्याचे सांगितले. 15 लाख रुपये मिळवून देण्यासाठी काही शासकीय शुल्क किंवा प्रोसेसिंग फी भरावी लागेल, अशी बतावणी आरोपीने केली.

Advertisement

5 महिने सुरू होता फसवणुकीचा खेळ 

ही फसवणूक ऑगस्ट 2025 पासून जानेवारी 2026 या दरम्यान घडली. आरोपीने सांगितलेल्या विविध खात्यांमध्ये शिवलकर यांनी गुगल पे द्वारे पैसे पाठवले. 15 लाख रुपये मिळतील या आशेने आजींनी थोडे-थोडे करत एकूण 9 लाख 21 हजार रुपये आरोपीच्या घशात घातले.

रत्नागिरी शहर पोलिसात गुन्हा दाखल

वारंवार पैसे भरूनही 15 लाख रुपये मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे शिवलकर यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे उत्तर प्रदेशमधील अमित चव्हाण याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
 

Topics mentioned in this article