Ratnagiri News: महिला तलाठी ACBच्या जाळ्यात! तहसील कार्यालयामध्येच रंगेहाथ पकडलं; टीप मिळाली अन्...

तहसील कार्यालयासारख्या शासकीय ठिकाणीच लाच स्वीकारताना त्यांना अटक झाल्याने महसूल विभागात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राकेश गुडेकर, रत्नागिरी: 

Dapoli News:  दापोलीमध्ये महिला तलाठ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची मोठी बातमी समोर आली आहे.  लाचलुचपत प्रतिबंधक रत्नागिरी विभागाने ही मोठी कारवाई केली. सातबाऱ्यावर खरेदीखताची नोंद करून फेरफार मंजूर करण्यासाठी दहा हजार रुपयांची घेताना तलाठी श्रद्धा बंडे यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

लाच घेताना तलाठी अटकेत

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दापोली तालुक्यातील नानटे सजा येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) श्रद्धा बालाजी बंडे यांना सातबारा उताऱ्यावर खरेदीखताची नोंद करून फेरफार मंजूर करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी युनिटने आज सायंकाळी रंगेहात अटक केली. ही कारवाई दापोली तहसील कार्यालयातील सभागृहात करण्यात आली असून या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Advertisement

DA Hike 2026 : सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आता होळीलाच, थकबाकी आणि वाढीव भत्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

तक्रारदार व त्यांच्या मित्रांनी मौजे तेरे वायंगणी येथील जमीन खरेदी केली होती. संबंधित खरेदीखताची सातबाऱ्यावर नोंद करून फेरफार मंजूर करण्याच्या प्रक्रियेसाठी ग्राम महसूल अधिकारी श्रद्धा बंडे यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. या मागणीबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. 

तक्रार प्राप्त झाल्यानंतर विभागाने प्राथमिक पडताळणी करून तक्रार खरी असल्याची खात्री केली आणि सापळा रचून आज सायंकाळी कारवाई केली. संशयित श्रद्धा बंडे या मागील वर्षीच शासकीय सेवेत दाखल झाल्या होत्या. तहसील कार्यालयासारख्या शासकीय ठिकाणीच लाच स्वीकारताना त्यांना अटक झाल्याने महसूल विभागात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी संबंधित कलमांखाली गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जात आहे.

Kalyan News : केडीएमसीची महासभा का रखडली? कोणाच्या दबावामुळे रखडली?', आंदोलनाचा इशारा

Topics mentioned in this article