जाहिरात

Kalyan News : केडीएमसीची महासभा का रखडली? कोणाच्या दबावामुळे रखडली?', आंदोलनाचा इशारा

कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांची महासभा 20 फेब्रुवारी दरम्यान होणे अपेक्षित होतं. पण महासभा अद्यापही पार पडली नाही. काय आहे यामागचं कारण?

Kalyan News : केडीएमसीची महासभा का रखडली? कोणाच्या दबावामुळे रखडली?', आंदोलनाचा इशारा
KDMC Mahasabha Latest Update
मुंबई:

अमजद खान, प्रतिनिधी

KDMC Mahasabha Latest News : कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांची महासभा 20 फेब्रुवारी दरम्यान होणे अपेक्षित होतं. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि त्यानंतर महापौर उपमहापौर बिनविरोध निवडही झाली. पण अद्यापही महासभेची तारीख स्पष्ट न झाल्याने शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक  पवित्रा घेतला आहे. भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी देखील महासभा संदर्भात महापौर आणि सचिवांना भेटून पत्रव्यवहार केला आहे. 

शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्यांनी केला आरोप

इतर महापालिकांमध्ये महासभेचे आयोजन करून बजेटवर सखोल चर्चा करून शहरातील विकासकामांना चालना देण्यात आली. मात्र कल्याण डोंबिवलीत अद्यापही महासभेचे आयोजन करण्यात आलेले नाही. "महासभेचे आयोजन करून पुढील वर्षाच्या बजेटवर चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र अद्यापही महासभेचे आयोजन करण्यात आलं नाही. त्यामुळे बजेटवर चर्चा न झाल्याने याचा परिणाम पुढील वर्षाच्या विकासकामांवर होऊ शकतो", असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी केला आहे.

नक्की वाचा >> Indian Railway: ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, 1 मार्चपासून IRCTC विसरा, 'या' APP वर करा बुकिंग

'कोणाच्या दबावामुळे महापालिकेची महासभा घेण्यास विलंब होतोय?' असा सवालही बोरगावकरांनी उपस्थित केलाय. महासभेचे आयोजन कधी करणार? याचा खुलासा 28 तारखेपर्यंत द्या. अन्यथा केडीएमसी मुख्यालयावर ढोल ताशांच्या गजरात जनजागर लोकशाहीचा अशाप्रकारचं जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा उबाठाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी महापौर उपमहापौर आयुक्तांना दिला आहे .कोकण विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या 119 सदस्य संख्याबळानुसार स्थायी समिती सदस्य तसेच स्वीकृत सदस्य नियुक्त करणार का? याबाबतचे स्पष्टीकरण देण्याची मागणीही बोरगावकर यांनी पत्राद्वारे  केली आहे

नक्की वाचा >> Good News : गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, शिष्यवृत्तीबाबत सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com