योगेश शिरसाठ, अकोला
देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त लालकिल्यावर कर्तव्यपथापव नेत्रदीपक परेड होणार आहे. यंदाच्या परेडमध्ये अकोल्यातील महापालिकेतील सफाई कर्मचारी अनिल हरी खोडे यांचा मुलगा आनंद अनिल खोडे व दुसऱ्या सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा सुमित पथरोड सहभागी होणार आहे.
सुमित हा पंतप्रधान बँड पथकात जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे, तर आनंद हा परेडमध्ये ऑल इंडिया एनसीसी परेडचे कमांडिंग करणार आहे. दोन्ही कॅडेट्स श्री शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. आनंद हा बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी असून वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षीच त्याची परेड कमांडर म्हणून निवड झाली आहे.
दरम्यान प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, पोलीस आणि निमलष्करी गटांचे जवान नेत्रदीपक परेड सादर करतील. देशभरातील विविध भागातून निवडक एनससी कॅडेट्स सुद्धा या परेडमध्ये पथसंचलन करतील. त्यामध्ये अकोल्याच्या जुने शहरच्या डाबकी रोड येथील रहिवाशी आनंद अनिल खोडे हा सुद्धा सहभागी होणार आहे.
(नक्की वाचा- Pune Metro News: पुणेकरांसाठी मोठी गुड न्यूज! प्रजासत्ताक दिननिमित्त मेट्रोची खास ऑफर; फक्त 20 रुपयात...)
आनंद हा श्री शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी असून त्याचे वडील अनिल खोडे हे महापालिकेत सफाई कर्मचारी आहेत. परेडमध्ये निवड व्हावी यासाठी आनंद एक वर्षापासून नियमित सराव करत होता. अतिशय मेहनत व परिश्रमानंतर परेडसाठी आनंदची निवड झाल्याची माहिती आनंदचे वडील अनिल हरी खोडे यांनी दिली.