जाहिरात

Rohit Pawar: गिरीश महाजनांची यशस्वी मध्यस्थी! रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित, काय तोडगा निघाला?

संत नामदेव पायरी येथून आमदार रोहित पवारांनी आंदोलनाची सुरुवात केली होती. त्यामुळे संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन विठ्ठलाच्या प्रसादाचा पेढा आणि सरबत घेऊन त्यांनी अन्नत्याग सोडला. 

Rohit Pawar: गिरीश महाजनांची यशस्वी मध्यस्थी! रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित, काय तोडगा निघाला?

Rohit Pawar Hunger Strike Protest Pandharpur:  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपलं अन्नत्याग आंदोलन अखेर मागे घेतले आहे. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. गिरीश महाजन यांची फोनवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी रोहित पवार यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला त्यानंतर रोहित पवार यांनी आपलं उपोषण मागे घेतले. 

IND-W vs PAK-W: दिप्ती शर्माने पंजा काढला, वर्ल्डकपमध्ये भारताची दमदार सुरुवात, पाकड्यांना चारली पराभवाची धूळ

रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित 

समोर आलेल्या माहितीनुसार, आमदार रोहित पवारांचे पंढरपुरात तीन दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू होते. यामध्येच रविवारी रात्री साडेदहा वाजलेपासून सव्वा अकरा वाजेपर्यंत मंत्री गिरीश महाजन आणि आमदार पवारांची चर्चा झाली. यामध्ये 22 एप्रिल पूर्वी बैठक घेण्याचे निश्चित झाले. यानंतर रोहित पवारांना अन्न त्याग मागे घेतला. महत्त्वाचे म्हणजे संत नामदेव पायरी येथून आमदार रोहित पवारांनी आंदोलनाची सुरुवात केली होती. त्यामुळे संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन विठ्ठलाच्या प्रसादाचा पेढा आणि सरबत घेऊन त्यांनी अन्नत्याग सोडला. 

मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला जाण्याच्या प्रस्तावावर आमदार रोहित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मान्यता दिली. शेतकरी संघटनेचे नेते इथे आलेले लोक सर्वपक्षीय लोकांना घेऊन आपण बैठकीला जाऊ. अधिवेशनापूर्वी बैठक घेऊन आणि यावर चर्चा करून निर्णय करू. तसेच चर्चा करून तोडगा निघाला नाही तर चार जुलैला मराठवाड्यात आंदोलन करू, असंही रोहित पवार यावेळी म्हणाले. 

1 लिटर पेट्रोल विकून भारत सरकार किती कमावतं? तेल कंपनी, पंप चालक यांना किती कमिशन मिळतं?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com