Rohit Pawar Tweet On Ajit Pawar Banner: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्रभर शोक व्यक्त केला जात आहे. राज्यभरात अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारे बॅनर्स झळकत आहेत. आपल्या लाडक्या लोकनेत्याच्या निधनानंतर नेते, कार्यकर्ते बॅनर्स लावून शोक व्यक्त करत आहेत. अशातच कर्जतमध्ये अजित पवार यांच्या श्रध्दांजलीचे बॅनर्स उतरवल्याने रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणालेत रोहित पवार?
"माझ्या मतदारसंघात कर्जत शहरात नागरिकांनी अत्यंत दुःखी भावनेने आणि जड अंतःकरणाने लावलेले मा. अजितदादांच्या श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगरपंचायतीने अत्यंत वाईट पद्धतीने काढून टाकले. ही बाब अत्यंत संतापजनक, मा. अजितदादांचा अवमान करणारी, नागरिकांच्या भावनांचा अनादर करणारी आणि त्यांच्या दुःखावर मीठ चोळणारी आहे. याबाबत चौकशी करून सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, ही विनंती" अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. याबाबतचे त्यांचे ट्वीट चांगलेच व्हायरल होत आहे.
Ajit Pawar VIDEO: बायोपिक आला तर हिरो कोण? खुद्द अजितदादांनीच सुचवलं होतं 'या' अभिनेत्याचं नाव!
'राजकीय चर्चा योग्य नाही...'
त्याचबरोबर "माननीय अजितदादा गेल्यापासून अनेकजण राजकीय चर्चा करताना दिसतायत, पण आज कोणत्याही राजकीय चर्चेपेक्षा मा. अजितदादांच्या जाण्याच्या दुःखाची व्याप्ती कितीतरी पट मोठी आहे. मा. अजितदादा आपल्यात असते तर चित्र वेगळं असतं आणि दादांशिवाय कुणीही त्यावर चर्चाही केली नसती, पण आज दादाच आपल्यात नाहीत. त्यांचं जाणं हे आपल्या सर्वांवरच आभाळ कोळसल्यासारखं आहे आणि अशा वातावरणात कुणीही राजकीय चर्चा करणं योग्य वाटत नाही," असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
"पवार कुटुंबातील एक सदस्य म्हणून माझी सर्वांनाच हात जोडून विनंती आहे की, दादांच्या आत्म्याला क्लेश होईल, त्यांच्या विचारांना ठेच पोचेल आणि त्यांच्या स्पष्ट व परखड स्वभावाला साजेसं वाटणार नाही असं तूर्तास तरी कुणीही न बोलणंच अधिक योग्य ठरेल. भविष्यात यथावकाश चर्चा करायला काही अडचण नाही पण त्यासाठीची योग्य वेळ आज नाही, हे सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे…! असं आवाहन त्यांनी केले आहे.
(नक्की वाचा- Vasai-Virar Mahapalika: वसई-विरारवर 'बविआ'चाच झेंडा! भाजपचा पराभव; अजीव पाटील नवे महापौर)