Nagpur Hit And Run Case: सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित केला सवाल, म्हणाले....

नागपूर हिट अँड रन प्रकरणातील महिला आरोपीच्या पतीलाही सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. 

Advertisement
Read Time: 2 mins

Nagpur Hit And Run Case : नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर सोमवारी (9 जून) संध्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही नागपूर हिट अँड रन प्रकरणावर मोठा प्रश्न उपस्थित केला. दोन तरुणांचे जीव घेणाऱ्या या हिट अँड रन प्रकरणाचा उल्लेख करून हीच का आपली संस्कृती? असा थेट सवाल त्यांनी केलाय. श्रीमंत घरातील महिला मद्य प्राशन करून नशेत वेगात कार चालवतात आणि निष्पाप लोकांचे बळी घेतात, हीच आहे का आपली संस्कृती असा सवाल करून त्यांनी भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागतील, असेही विधान केले.  

(नक्की वाचा: '15 मिनिटांमध्ये परत येतो' CBI च्या बोगस गँगनं HDFC च्या खात्यातून गायब केले 85 लाख रुपये)

दरम्यान या प्रकरणी सोमवारी (10 जून) एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत दोघांचा जीव घेणारी आरोपी महिला रितिका मालू हिच्या पतीला तब्बल तीन महिन्यानंतर नागपूर पोलिसांनी पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली सोमवारी न्यायालयात हजर केले आणि काही तासात त्याला जामीन सुद्धा मिळाला. या व्यक्तीचे नाव दिनेश मालू असल्याचे समजते. मुख्य म्हणजे ही घटना घडून तीन महिने उलटले आहेत, पण नागपूर पोलिसांनी त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नव्हती.  

(नक्की वाचा : Pune Porsche Accident Case: आरोपी विशाल अग्रवालविरोधात आणखी एक गुन्हा दाखल)

25 फेब्रुवारी 2024 रोजी मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवून दोन जणांचे जीव घेणाऱ्या आरोपी महिलेला नागपूर पोलीस कोणताही कायदेशीर अडसर नसताना अटक करू शकलेले नाही, ही संतापजनक बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करताहेत. 

(नक्की वाचा: शेतकऱ्याच्या व्हाट्सअ‍ॅप स्टेटसची कमाल, चोरीला गेलेला बैल सापडला)

Topics mentioned in this article