NDTV मराठीच्या महाराष्ट्राचा जाहीरनामा कार्यक्रमात युवा पॅनलअंतर्गत मनसेचे संदीप देशपांडे आणि अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्याकडून आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल भूमिका जाणून घेण्यात आली. यावेळी त्यांनी महायुतीचं सरकार सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला. लाडकी बहीण योजनेमुळे दुर्बल घटकातील महिलांना मोठा फायदा झाला आहे.
संजय गांधी निराधार योजना मोफत दिल्या जात होत्या. त्यावेळी राजकारण केलं गेलं नाही. आता विरोधक सर्व लाडकी बहीण योजनेशी जोडतात. त्यावर टीका करतात. त्यांना या योजनेशी धास्ती वाटते. अद्यापही संजय गांधी निराधार योजना सुरू आहेत. मात्र आम्ही याचा संबंध कोणाशीही जोडला नाही. लाडकी बहीण योजना दुर्बल घटकातील महिलेसाठी आहे. राजकारणाच्या इतिहासात २ कोटी ४० लाख महिन्यांच्या खात्यात पैसे झाले. महिला आर्थिक साक्षर झाली.
नक्की वाचा - प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळे मोदी-शहांना मदत होते, संजय राऊतांचा थेट आरोप!
बारामतीतून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देणे टाळता आले असते का?
एक चांगल्या पद्धतीचे व्हिजन महाराष्ट्राला देणारी व्यक्ती बारामतीमधून येतेय, त्यामुळे कोणीही उमेदवार दिला तरी त्याचा फारसा फरक पडणार नाही. लोकशाही पद्धतीने ही निवडणूक लढुया आणि चांगल्या पद्धतीने लोकांमधला कौल जनतेसमोर पुन्हा दिसेलघराणेशाही वरळीत तसाच बारामतीत...
घराणेशाहीबद्दल बोलताना चाकणकर म्हणाल्या, महाराष्ट्राचं राजकारण बारामतीतून सुरू होतं. त्यामुळे राज्याचं लक्ष कायम बारामतीकडे असतं. वडील डॉक्टर म्हणून मुलगा डॉक्टर होत नाही. त्याला प्रॅक्टिस करावी लागते. जनतेचा कौल मिळाला तरी पाच वर्षांची संधी दिल्यानंतर त्याचं काम पाहिलं जातं. घराणेशाहीतून आलेली व्यक्ती राजकारणाचा मार्ग स्वीकारत असताना कौटुंबिक पाठबळ असल्याने रस्ता सुकर होतो. मात्र प्रत्येकाला कर्तृत्व सिद्ध करावं लागलं. प्रत्येकाला आपलं अस्तित्त्व पणाला लावावं लागतं.
सत्तेत मनसेला सोबत घेणार का याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, लोकसभेचं गणित वेगळं होतं. मात्र विधानसभेत पक्षातील काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याला संधी मिळण्याची अपेक्षा असते. विधानसभेत 288 जागा आहेत. मनसेसाठी दरवाजे खुली असतील असा विश्वास चाकणकरांनी व्यक्त केला.