1 day ago

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे 24 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हा सिंड्रोम पसरू नये यासाठी यंत्रणा अलर्टवर आहे. आज वाल्मिक कराडची पोलीस कोठडी संपणार असून विशेष मोक्का न्यायालयापुढे सुनावणी होणार आहे. याशिवाय त्याला आज व्हीसीद्वारे हजर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Jan 22, 2025 20:53 (IST)

Live Update : टीम इंडियाचे बॉलर्स चमकले, इंग्लंडची इनिंग स्वस्तामध्ये आटोपली

IND vs ENG 1st T20 Live Score : भारतीय बॉलर्सनी भेदक मारा करत इंग्लंडला रोखलं. टीम इंडियाकडून वरुण चक्रवर्तीनं सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलनं यांना प्रत्येकी 2 विकेट्स मिळाल्या.

इंग्लंडकडून कॅप्टन जोस बटलरनं एकाकी लढत देत 68 रन्स केले. 

Jan 22, 2025 20:51 (IST)

Live Update : टीम इंडियाचे बॉलर्स चमकले, इंग्लंडची इनिंग स्वस्तामध्ये आटोपली

IND vs ENG 1st T20 : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात कोलकातामध्ये पहिला T20 सामना सुरु आहे. या सामन्यात पहिल्यांदा बॅटींग करताना इंग्लंडची इनिंग 132 रन्सवरच ऑल आऊट झाली आहे. 

Jan 22, 2025 20:44 (IST)

Jalgaon Train Accident: जळगाव रेल्वे अपघात! मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत

जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असंही ते म्हणालेत. 

Jan 22, 2025 19:33 (IST)

Vasai Crime: नायगावमध्ये जमिनीच्या वादातून गोळीबार, सात जण जखमी

वसई पूर्वेच्या नायगाव बाफाणे येथे जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात ३ जण जखमी झाले असून लाट्या गाठ्याने मारहाण केल्याने आणखी चार जण असे एकूण सात जण जखमी झाले आहेत.  जखमीना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आरोपी मेघराज भोईर याने त्याच्याकडील बारा बोअर बंदुकी मधून गोळीबार केला. या गोळीबारामध्ये संजीव जोशी, अनिस सिंग आणि इतर ५ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांचे पथक दाखल होऊन त्यांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Advertisement
Jan 22, 2025 19:14 (IST)

Jalgaon Train Accident: जळगावमधील घटना दुर्दैवी, आपातकालिन यंत्रणा सज्ज: CM देवेंद्र फडणवीस

जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे.

Jan 22, 2025 17:39 (IST)

Jalgaon Train Accident: जळगावमध्ये भीषण रेल्वे अपघात! भरधाव ट्रेनने अनेकांना उडवलं

जळगावच्या पाचोरामधून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जळगावच्या पाचोरामध्ये भीषण रेल्वे अपघात झाल्याचे समोर आले आहे. जळगावच्या परधोड रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसमधून आगीच्या भितीने काही प्रवाशांनी उड्या मारल्या त्यांना समोरुन येणाऱ्या ट्रेनने उडवल्याचे समोर आले आहे. यामध्ये मोठी जिवीतहानी झाल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. 

Advertisement
Jan 22, 2025 17:08 (IST)

Pune News: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शरद पवारांच्या भेटीला

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले शरद पवारांच्या भेटीला . पुण्यात नाना पटोले घेणार शरद पवारांची भेट

 पुण्यातील मोदी बाग येथे नाना पटोले घेणार शरद पवारांची भेट...

महाविकास आघाडी मध्ये समन्व्य नसल्याचं विधानसभा निवडणूकिंच्या निकालानंतर दिसून आलं होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्वातंत्र्य लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. मात्र यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेचा वाद पुन्हा एकदा चाव्हट्यावर आला होता. महाविकास आघाडी एकजूट राहावी यासाठी नेत्यांशी चर्चा करू असं शरद पवारांचं वक्तव्य होतं. त्यांनंतर ही भेट होत आहे. 

Jan 22, 2025 17:07 (IST)

Satara News: डॉक्टरच्या हलगर्जी पणाने पाय गमावलेल्या वडिलांवर साताऱ्यात आत्मदहनाची वेळ

 महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या फलटण येथील राऊत कुटुंबातील शंभूराज चां पाय काढावा लागला फलटण येथील एका हॉस्पिटल च्या हलगर्जी पणामुळे शंभूराज ला त्याचा पाय गमवावा लागला. बारा वर्षाचा शंभूराज राऊत याचा पाय कापावा लागल्यामुळे त्याचे वडील संतोष दत्तात्रय राऊत यांनी संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी सहा महिने पाठपुरावा केला. 

पण, अद्यापही त्यांना  प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही. उलट वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही चौकशी समिती न नेमता सदर डॉक्टरला पाठीशी घालण्यातच धन्यता मानलेले आहे. या सर्व गोष्टीला कंटाळलेल्या पालक संतोष राऊत यांनी प्रजासत्ताक दिनी दिनांक २६ जानेवारी रोजी राऊत कुटुंबीय साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालना बाहेर  सामुदायिक आत्मदहन करण्यार असल्याची  सांगितले

Advertisement
Jan 22, 2025 17:06 (IST)

BKC Traffic: ट्रॅफिक पोलिसांनी बीकेसी मधील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी पावले उचलली आहेत

ट्रॅफिक पोलिसांनी  बीकेसी मधील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी पावले उचलली आहेत 

सातत्याने बीकेसी परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याचे तक्रार समोर आली होती त्या धरतीवर पावले उचलली आहे 

बीकेसी कनेक्टर जंक्शन आणि एनएसी जंक्शन या रोडवर वाहतूक बंदी करण्यात आली आहे 

वुई वर्क बिल्डिंग गॅप ते बीकेसी कनेक्टर जंक्शन असे तीन रस्ते बंद करण्यात आले आहे

Jan 22, 2025 14:58 (IST)

Live Update : लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नाही - आदिती तटकरे

लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नाही - आदिती तटकरे

Jan 22, 2025 14:57 (IST)

Live Update : राज्य राखीव दलाच्या जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली येथील राज्य राखीव दलाच्या जवानाने शासकीय निवासस्थानात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जी.एम.शहाणे असे या राज्य राखीव दलाच्या जवानाचे नाव आहे. घटना समजल्यानंतर हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर आणि कर्मचाऱ्यांनी  घटनास्थळी धाव घेत जवान शहाणे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी करता जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला असून या जवानाच्या आत्महत्येचं कारण अजून अस्पष्ट आहे. 

Jan 22, 2025 14:38 (IST)

Torres Scam: टोरेस आर्थिक घोटाळा प्रकरणात SIT नेमण्याचे आदेश

टोरेस आर्थिक घोटाळा प्रकरणात उच्चन्यायालयाने sit नेमण्याचे दिले आदेश..

Eow अंतर्गत तयार करण्यात येणार SIT टीम..

टोरेस आर्थिक घोटाळा प्रकरणात आज उच्चन्यायालयात झाली सुनावणी..

या सुनावणीत ca अभिषेक गुप्ता यांना पुढील 8 आठवड्या साठी सुरक्षा वाढवून देण्यात आली..

तर टोरेस प्रकारणात घोटाळा उघड होण्या आधी दाखल झालेले सर्व गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्यासंदर्भात दिले आदेश...

Jan 22, 2025 14:35 (IST)

Live Update : मदतीला धावून आलेल्या रिक्षाचालकाने घेतली सैफ अली खानची भेट

सैफ अली खान यांनी रिक्षाचालक भजन सिंग यांची भेट घेतली. सैफ अली खानने रिक्षा चालक भजन सिंग यांचे आभार मानले.  रुग्णालयातून डिस्चार्ज घेण्यापूर्वी सैफ अली खान याची भेट घेतली. भजन सिंग वेळीच मदतीला धावून आल्याने सैफ अली खानचा जीव वाचवला. हल्ल्यानंतर भजन सिंग यांनी आपल्या रिक्षात टाकून सैफ अली खान यांना लीलावती रुग्णालयात नेलं. 

Jan 22, 2025 14:13 (IST)

Live Update : संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा 

न्यायाच्या लढ्यासाठी आम्ही दोन पावले पुढे आलो आहोत...

तुम्ही आमच्या सोबत राहा... माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे...

वैभवी देशमुख हिचे पंढरपुरातील मोर्चात उपस्थितना भावनिक साद

Jan 22, 2025 13:35 (IST)

Live Update : पुण्यातील कोंढवा परिसरातून 1 किलो 90 ग्रॅम अफीम जप्त तर एकाला अटक

पुण्यातील कोंढवा परिसरातून 1 किलो 90 ग्रॅम अफीम जप्त तर एकाला अटक करण्यात आली आहे आणि 5 जणांना ताब्यात घेतलं आहे  

कोंढवा परिसरात असलेल्या उन्नती धाम सोसायटीच्या परिसरात एका इसमाकडे संशयावरून चौकशी केली असता त्याचाकडे 1 किलो 90 ग्रॅम आफीम अढळून आले 

या प्रकरणात नथुराम जिवणराम जाट (52) अस अटक केलेल्या आरोपीच नाव आहे; तो मूळचा राजस्थानचा निवासी आहे.  

अमली पदार्थ विरोधी पाठकने ही करवाई करत आरोपीकडून 21 लाख 80 हजार रुपयांचा आफीम जप्त केला आहे. तर NPDS एक्ट अंतर्गत कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

अधिक तपासात अशी माहिती समोर आली की आरोपी नथुराम हा पुण्यात फर्नीचर बनवण्याचा कामासाठी पुण्यात यायचा परंतु अल्पकाळात पैसे कमवण्याच्या उद्देशाने त्याने आफीम विकायचे ठरवले

Jan 22, 2025 13:32 (IST)

Live Update : तीन दिवसीय सरपंच महोत्सव, जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंचांना एकत्र आणण्याचा प्रयत्न

सरपंच महोत्सव समिती वरोरा यांनी जिल्हास्तरीय सरपंच आणि क्रीडा महोत्सवासोबतच 'कृषी प्रदर्शन' आणि 'रक्तदान शिबिर' आयोजित केले आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून समन्वय साधण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांना एकत्रित आणन्यासाठी राज्यात प्रथमच 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान वरोरा येथील काटन मार्केट परिसरात सरपंच महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच महोत्सव आयोजन समितिचे अध्यक्ष गणेश चवले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Jan 22, 2025 13:30 (IST)

Live Update : अखेर वाल्मिक कराडला बीड कारागृहातच ठेवणार

अखेर वाल्मिक कराडला बीड कारागृहातच ठेवणार 

काही वेळात कराडला बीड शहर पोलीस ठाण्यातून कारागृहात हलवणार

कारागृहात नेण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाणार

Jan 22, 2025 12:41 (IST)

Live Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित

संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित 

दीड महिन्यापासून कृष्णा आंधळे आहे फरार

माहिती सांगणाऱ्यास बक्षीस देणार

तपास यंत्रणांना देत आहे गुंगारा

Jan 22, 2025 12:06 (IST)

Live Update : लाडकी बहीण माझी संकल्पना होती, ती आम्ही आणली - एकनाथ शिंदे

लाडकी बहीण माझी संकल्पना होती, ती आम्ही आणली - एकनाथ शिंदे

Jan 22, 2025 12:02 (IST)

Live Update : संत निवृत्तीनाथ महाराजांची 25 तारखेला त्र्यंबकेश्वर येथे समाधी यात्रा

- संत निवृत्तीनाथ महाराजांची येत्या शनिवारी 25 तारखेला त्र्यंबकेश्वर येथे समाधी यात्रा असते..

- संत निवृत्तीनाथांच्या यात्रेनिमित्त नाशिकमध्ये हजारो वारकरी राज्यभरातून दाखल...

- शेकडो दिंड्या या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून पायी चालत त्र्यंबकेश्वरकडे रवाना 

- आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी पंचवटी येथे दाखल...

- नाथांच्या समाधी यात्रेला तीन दिवस अवधी असताना राज्यभरातून हजारो पालख्या त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथांच्या भेटीसाठी दाखल होत आहे.

Jan 22, 2025 11:22 (IST)

Live Update : बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात केंद्रीय प्रशासकीय न्यायधिकरणासमोर सुनावणी

बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात केंद्रीय प्रशासकीय न्यायधिकरणासमोर सुनावणी

बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरची केंद्रीय लोकसेवा आयोगाने केलेल्या बडतर्फी विरोधात केंद्रीय प्रशासकीय न्यायधिकरणासमोर सुनावणी आहे. केंद्र सरकारने पूजा खेडकरला सप्टेंबर 2024 मध्ये हखोटी कागदपत्र सादर केलेल्या आरोपाखाली बडतर्फ केले होते. 

Jan 22, 2025 10:25 (IST)

Live Update : ईस्टन एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी, वाहनाच्या लांबच लांब रांगा

ईस्टन एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी 

वाहनाच्या लांबच लांब रांगा 

बेस्ट बस आणि कचरा गाडीचा अपघात झाल्याने झाली वाहतूक कोंडी

Jan 22, 2025 10:15 (IST)

Live Update : एक फेब्रुवारीपासून नाशिक-जयपूर विमान सेवा पूर्ववत होणार

नाशिक जयपुर विमान सेवा एक फेब्रुवारी पासून पूर्ववत होणार असून आठवड्यातून 3 दिवस ही विमानसेवा सुरू असेल. यामध्ये मंगळवार ,बुधवार ,शनिवार अशी तीन दिवस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. 

ही सेवा हॅप्पीग प्रकारची असून व्हाया इंदूर देण्यात येत आहे. 78 आसनी एटीआर प्रकारच्या विमानाद्वारे इंडिगो कंपनीकडून ही सेवा देण्यात येत आहे. ही सेवा गत महिन्यापासून जयपुर विमानतळावरील दाट धुक्यामुळे महिना भरासाठी स्थगित करण्यात आली होती.

Jan 22, 2025 08:05 (IST)

Live Update : श्रीरामपूर-नेवासे मार्गावर लग्न समारंभाहून परतणाऱ्या बोलेरो कारला अपघात, 3 जणांचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

श्रीरामपूर नेवासे राज्यमार्गावर टाकळीभान शिवारात मंगळवारी सायंकाळी एक दुर्दैवी अपघात घडलाय. लग्न समारंभातून परतताना एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बोलेरो वाहनाचे नियंत्रण सुटून ते लिंबाच्या झाडावर धडकले. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले.

बोलेरो मधून वऱ्हाडी मंडळी परत येत असताना टाकळीभान शिवारातील स्वस्तिक ट्रेंड्रिंग दुकानासमोर दिगंबर शिंदे यांची स्कुटी अचानक समोर आली. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि बोलेरो झाडावर धडकली.

जखमींना श्रीरामपुर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींना अहिल्यानगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

Jan 22, 2025 07:59 (IST)

Live Update : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, गुरुवारी अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा राहणार बंद

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, गुरुवारी अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा राहणार बंद

तर शुक्रवारी कमी दाबाने होणार पाणीपुरवठा 

पुणे महानगरपालिकेद्वारे शहरात जलवाहिनीचे काम करण्यात येणार असल्याने शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा राहणार पूर्णपणे बंद

उद्या कात्रज, स्वारगेट, महर्षी नगरसह अनेक पेठांमधील पाणीपुरवठा बंद

Jan 22, 2025 07:27 (IST)

Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर 

23 आणि 24 जानेवारी रोजी राज ठाकरे यांचा नाशिक दौरा 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा नाशिक दौरा 

मनसेच्या नाशिक मधील पदाधिकाऱ्यांबरोबर राज ठाकरे घेणार बैठक

Jan 22, 2025 07:26 (IST)

Live Update : कर्नाटकातील भाविकाकडून श्रीतुळजाभवानी चरणी पाच तोळे वजनाची सोनसाखळी अर्पण

कर्नाटकातील बिदर येथील भाविक पांडुरंग हुलाजीराव पाटील यांनी तुळजाभवानी देवीस पाच तोळे वजनाची वजनाची सोन्याची साखळी अर्पण केली. यावेळी मंदिर संस्थांतर्फे त्यांचा साडीचोळी आणि देवीजींची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर संस्थानचे विश्वास कदम, गणेश मोटे, राकेश पवार इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

Jan 22, 2025 07:25 (IST)

Live Update : पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 24 संशयित रुग्ण, दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याचा ग्रामीण भागात गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे 24 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यात पुणे महापालिका हद्दीत 5, पिंपरी चिंचवड महापालिकेत 2, ग्रामीण भागामध्ये 16 आणि पुणे जिल्हा बाहेरील 1 संशयित रुग्णांचा समावेश आहे. 24 पैकी दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत; तर 8 रुग्ण अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत आहेत.