
बीडच्या राजकारणाची चर्चा नेहमी राज्यभारात होत असते. यावेळी देखील बीडची राजकारण चर्चा आहे. बीडमध्ये यंदा पिता-पुत्र आमने-सामने आले आहेत. विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात त्यांचे वडील प्रचार करताना दिसत आहेत.
आमदार संदीप क्षीरसागर यांची लढत त्यांचे चुलत भाऊ डॉ. योगेश क्षीरसागर यांच्याशी होत आहे. परंतु या लढाईत संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर हे मात्र त्यांच्या विरोधात प्रचार करत असल्याचे पाहायला मिळाले.
(नक्की वाचा- मविआचं सरकार आल्यास बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनंतर सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य)
नवगन राजुरी या क्षीरसागर यांच्या मूळ गावी झालेल्या सभेत रवींद्र क्षीरसागर यांनी त्यांचा मुलगा आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप करत या निवडणुकीत पुतण्या डॉ. योगेश क्षीरसागर यांनाच मतदान करा, असे आवाहन केले. वडीलच मुलाऐवजी पुतण्याला मतदान करण्याचे आवाहन करत असल्याने याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
(नक्की वाचा- "आमचं ठरलयं...", बारामतीत अखेरच्या क्षणी 'लेटर पॉलिटिक्स')
गेल्या काही काळापासून रवींद्र क्षीरसागर व संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये मतभेद असल्याचे दिसून आले होते. दरम्यान आता विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व त्यांचे बंधू रवींद्र क्षीरसागर यांनी पुतण्या डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या बाजूने उभे राहत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.