
शरद सातपुते, प्रतिनिधी:
Sangli News Son in Law Buys helicopter: नुकताच दसऱ्याचा सण पार पडला. नवरात्र, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अनेकांनी, सोने, घर, गाडी खरेदी केली, ज्याचे फोटो, व्हिडिओ माध्यमांवर व्हायरलही होत असतात. मात्र सांगलीमधील एका जावयाने केलेली दसरा खरेदी सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडीचे जावई शिवाजी पवार यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन हेलिकॉप्टरची खरेदी केली. त्याच्या पूजनासाठी ते थेट सासरवाडीत हेलिकॉप्टर घेऊन आले. आटपाडीच्या जावयाच्या या आगळ्यावेगळ्या कर्तुत्वाचे परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती. (Sangli Viral Story)
दसऱ्याला हेलिकॉप्टर खरेदी!
हौसेला मौल नाही असं म्हणतात.. असाच काहीसा प्रकार सांगलीमध्ये घडला आहे. सांगलीच्या आटपाडी गावच्या जावयांनी केलेली हेलिकॉप्टर खरेदी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. आटपाडीची कन्याशाशिकला नांगरे यांचा कोल्हापूर येथील ठेकेदार शिवाजी पवार यांच्याशी 25 वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. आटपाडीतील रवींद्र चव्हाण यांच्या त्या मोठ्या बहीण आहेत. शिवाजी पवार हे शासकीय कामे घेतात. तसेच त्यांचे इतरही उद्योग आणि व्यवसाय आहेत.
Pune News: फक्त 70 रुपयात कोणताही दाखला! 'या' जिल्ह्यातील 1200 गावात 'आपले सरकार केंद्र' सुरु
हेलिकॉप्टरने लेक आली माहेरला
या व्यवसायासाठी त्यांनी अनेक चार आणि सहा चाकी गाड्या खरेदी केल्या आहेत. मात्र त्यांचे हेलिकॉप्टर खरेदीचे स्वप्न होते. ते यंदाच्या दसऱ्याला त्यांनी पूर्ण केले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन हेलिकॉप्टर विकत घेतले. पवार जावयांच्या आटपाडीशी चांगला जिव्हाळा असून तेथेही त्याने अनेक मित्रमंडळी जोडलेले आहेत.
हेलिकॉप्टर बघण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी
दसऱ्याच्या मुहूर्तावर हेलिकॉप्टर खरेदी केल्यावर नवीन हेलिकॉप्टर घेऊन थेट सांगलीच्या आटपाडीमध्ये सासरवाडीमध्ये पूजनासाठी आणले. यावेळी हेलिकॉप्टरचे पूजन करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि याच हेलिकॉप्टरमधून कन्या सासरी हेलिकॉप्टरमधून गेली. हे हेलिकॉप्टर बघण्यासाठी गावकऱ्यांनी चांगलीच गर्दी केली होती. या रॉयल जावयाची सध्या जिल्ह्यात चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world