Sangli News : सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे (28 जुलै) देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होते. दुपारी या शर्यतीची अंतिम फेरी पार पडली. या नागोळेच्या मैदानात प्रथम क्रमांकसाठी सुलतान आणि राम्या या बैल जोडीने मैदान मारले. सुलतान आणि राम्या हे ऐतिहासिक देवभाऊ केसरीचे पहिले मानकरी ठरले आहेत.
महाराष्ट्रात सर्वात जुना शर्यतीचे मैदान म्हणून रांगोळ्याच्या बैलगाडी शर्यतीची ओळख आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि नागपंचमी निमित्ताने या स्पर्धा पार पडल्या. यावेळी मोठ्या संख्येने बैलगाड्या शर्यतीमध्ये सहभागी झाल्या होत्या. तर पाहिले बक्षीस 5 लाख 55 हजार 555 रुपये आहे. तर दुसरे बक्षीस 3 लाख 5 हजार 555 आणि तिसरे बक्षीस 2 लाख 5 हजार 555 होते. या शर्यती पाहण्यासाठी लाखांहून अधिक लोक जमा झाले होते. भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उदघाटन झाले.
नक्की वाचा - Dog Babu Domicile Certificate: कुत्रेही बिहारचे रहिवासी झाले ? 'डॉग बाबू'ला मिळाले डोमिसाईल सर्टिफिकेट
आदत, धूसाधूसा आणि जनरल अशा वयोगतील बैलांच्या शर्यती या ठिकाणी पार पडल्या. बैलांची आरोग्य तपासणी आणि लम्पि रोगाची तपासणी करून बैल शर्यतीमध्ये उतरवण्यात आले होते. अतिशय शिस्तबद्ध बैलगाडी शर्यत नागोळेच्या मैदानावर पार पडली.
पहिला क्रमांक - जनरल गटामध्ये सुलतान आणि राम्या हे महाराष्ट्रचा राज्या देवभाऊ केसरीचे पाहिले मानकरी ठरले आहेत.
दुसरा क्रमांक - हरण्या आणि गज्या या जोडीने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
तिसरा क्रमांक - गुलब्या आणि कॅडबरी यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे.