Sangli News: मोबाईलचा हट्ट, आईने बर्थडे गिफ्ट न दिल्याने 9 वीतील मुलाने आयुष्य संपवलं, सांगलीत खळबळ

सांगलीच्या मिरज येथील मंगळवार पेठ, कुंकुवाले गल्ली परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची  मिरज शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

शरद सातपुते, सांगली:

आईने वाढदिवसाला मोबाईल गिफ्ट न दिल्याने 13 वर्षीय फुटबॉलपटूने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विश्वजीत रमेश चंदनवाले असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.  सांगलीच्या मिरज येथील मंगळवार पेठ, कुंकुवाले गल्ली परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची  मिरज शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,   विश्वजीत चंदनवाले हा आपल्या आई व इतर नातेवाईकांच्या सोबत मंगळवार पेठ येथे वास्तव्यास होता. इयत्ता 9 वी मध्ये शिकणारा विश्वजीत हा फुटबॉल खेळाडू आहे. पुढील आठवड्यात तो स्पर्धेसाठी परगावी जाणार होता. विश्वजीत याचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस झाला होता. त्यावेळी त्याने आईकडे नवीन मोबाईल घेऊन द्यायची मागणी केली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मात्र एमआयडीसी मध्ये कामाला जात असल्याने कौटुंबिक परिस्थिती नसल्याने नकार दिला. त्यानंतर दोन दिवस विश्वजित नाराज होता. शनिवारी मध्यरात्री आई आणि बहीण झोपी गेल्यावर तो घराच्या गच्चीवर गेला आणि त्याने सोलरसाठी उभा केलेल्या लोखंडी अँगल ला गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी ही घटना उघडकीस आली. 

दरम्यान, या दुर्दैवी घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पच्यात आई, वडील, दोन बहीण असा परिवार आहे. घटनेची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.  मोबाईल मुले जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

( नक्की वाचा : State Cabinet Portfolio राज्यमंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणतं खातं कुणाकडं? वाचा सर्व माहिती )

कोल्हापूरमधूनही आत्महत्येची भयंकर घटना समोर आली आहे. मित्रांना इन्स्टावर फोनवरून लाइव्ह येण्याचे सांगून तरुणानेनदीत उडी घेतल्याची घटना घडली. आजी आणि मामासोबत झालेल्या किरकोळ वादातून हे कृत्य केलं असल्याची माहिती आहे. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. लक्ष्मीपुरी पोलीस आणि महापालिकेच्या अग्निशामक दलाकडून सायंकाळ पर्यंत शोधमोहीम सुरु होती. 

पुलाजवळ वडणगेच्या दिशेला त्याची दुचाकी मिळाली. मात्र अद्यापही तरुणाचा शोध लागलेला नाही. या घटनेची माहिती मिळताच हर्षवर्धनचे नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी शिवाजी पुलावर पोहोचले. मुलाने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article