सांगली: 'जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस म्हणून ते कधी समाधानी नसतात. ते टप्प्यात आणून काम करतात, पण जयंत पाटील आम्ही टप्यात आणून कार्यक्रम करतोय,' असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार गोपीचंद गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
"जयंत पाटील हे टप्यात आणून काम करतंय मला एक जण म्हणाला. पण जयंत पाटील आम्ही टप्यात आणून कार्यक्रम करतोय अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. जयंत पाटील नीच, कपटी माणूस ते कधीच समाधान नसतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. ते सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये बहुजन समाजातर्फे सत्कार कार्यक्रमत बोलत होते.
'जतमध्ये मी निवडून न येण्यासाठी जयंत पाटील यांनी खूप प्रयत्न केला. पण जतच्या लोकांना कळतंय कोणाला घरी घालवायचे. तुम्ही सांगायची गरज नाही. जयंत पाटील हे टप्यात आणून काम करतंय मला एक जण म्हणाला. पण जयंत पाटील आम्ही टप्यात आणून कार्यक्रम करतोय,' अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
( नक्की वाचा : Delhi Exit Poll : दिल्लीमध्ये 'AAP' ची पुन्हा सत्ता की भाजपाचं 27 वर्षांनी कमबॅक? पाहा काय आहे अंदाज )
दरम्यान, जयंत पाटील यांच्यावर मी बोलतोय म्हणता तुम्ही, पण हे जयंत पाटील मला किती विरोध करतोय हा. जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस आहे. मी विधान परिषदेचा आमदार झालो त्यावेळी मला विरोध केला. निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी मला विरोध करत आक्षेप घेतला. तुम्ही खोटी माहिती दिली आहे अर्ज बाद करा, असे जयंत पाटील यांनी सांगितल्याचेही गोपीचंद पडळकर म्हणाले.