शरद सातपुते, सांगली: एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सासू सुनेचा मृत्यू झाला असून बाप लेकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून कुटुंबाला नेमकी विषबाधा झाली की विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे एकाच कुटुंबातील चौघांनी विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे,यामध्ये दोन महिलांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.रमेजा अल्लाउद्दीन पाटील (वय ४५) व काजल समीर पाटील (वय ३०) असं या सासू-सुनांचे नावे आहेत,तर अल्लाउद्दीन पाटील व समीर पाटील या दोघा बाप लेकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Panvel Drugs : रेल्वेतून नेले जात होते 35 कोटींचे ड्रग्ज, पनवेलमध्ये 'या' पद्धतीनं झाला पर्दाफाश
नांगोळे गावांमध्ये ढालगाव रस्त्यालगत पाटील कुटुंबीयांचं घर आहे.सकाळच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे,या घटनेनंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सुरु केला आहे,मात्र हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून झाला आहे,हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. तर ही आत्महत्या आहे ही घातपात याबाबत पोलीस तपास करत असून या घटनेमुळे कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.