Sangli News : एका विवाहित महिलेने सावकाराच्या जाचाला कंटाळुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील वडडी येथे ही घटना आहे. सुलोचना संजय म्हेत्रे (वय 44 वर्ष) असे या महिलेचे नाव आहे. सुलोचना म्हेत्रे या भाजी विक्रीचा व्यवसाय करत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी वडडी येथील राहत्या घरात सुलोचना मैत्री यांनी राहत्या घरात आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुलोचना यांनी चिठ्ठी देखील लिहिली. सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांना चिठ्ठीत नमूद केल्याचे नातेवाईकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान याघटनेप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये झाली असून या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.