शरद सातपुते, सांगली:
Vita Building Fire News: सांगलीमधून एक भीषण दुर्घटनेची बातमी समोर आली आहे. सांगली जिल्ह्यामधील विटा शहरात इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन वर्षाच्या चिमुकलीसह तिघांचा समावेश आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील विटा शहरात एका तीन मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या आगीमध्ये दोन जण जखमी झाले आहेत, तर दोन वर्षांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा अंत झाला आहे.
Beed News: 'संतोष भैय्यानंतर तुझाच नंबर होता'; मनोज जरांगेंचे सहकारी काळकुटेंना जीवे मारण्याची धमकी
विटा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर स्टील फर्निचरचे दुकान याच दुकानाला ही भीषण आग लागली आणि ती काही क्षणातच संपूर्ण इमारतीत पसरली. या आगीमध्ये इमारत पूर्णपणे जळून खाक झाली आहे। या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आई-वडील, मुलगी आणि नात अशा चौघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे.
विष्णु जोशी (वय ४७), सुनंदा विष्णु जोशीं (वय ४२), प्रियांका योगेश इंगळे (वय २५), सृष्टी इंगळे (वय २) अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याव्यतिरिक्त, इमारतीत असलेले अन्य दोन जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
(नक्की वाचा- सरकारी कार्यालयातील भंगार विकून सरकार मालामाल! 7 'वंदे भारत' ट्रेन खरेदी करता येतील एवढी कमाई)
दरम्यान, अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले असून, आगीच्या नेमक्या कारणांचा आणि नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा मृत्यू झाल्याने सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.