शरद सातपुते, सांगली: सांगलीच्या कवठेमहांकाळ येथील कवठेमहांकाळ जत रस्त्यावरील मोहन माळी इंटरनॅशनल स्कूल मध्ये संस्थाचालक मोहन माळी यांनी विद्यार्थ्यांना नाकातून रक्त येईपर्यंत जबरदस्त मारहाण केल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे . पालकांच्या मीटिंगमध्ये विद्यार्थ्यांनी शाळेच्या गलथान कारभाराबद्दल तक्रार केली होती याचा राग मनात धरून संस्थाचालक यांनी मुलांना मारहाण केल्याची घटना घडलेली आहे.
नक्की वाचा - Awhad vs Padalkar: विधानभवनात आव्हाड-पडळकरांचे कार्यकर्ते भिडले, जोरदार राडा
मुलांनी आपल्या पालकांना शाळेमध्ये जे खाद्य दिलं जातं अन्न दिलं जातं त्यामध्ये किडे अळ्या असे प्रकार होत असून शाळेच्या आवारात दुर्गंधी अस्वच्छता असल्याने मुलांना नाहक त्रास सोसावा लागत होता त्याशिवाय निवासी शाळा असताना शाळेत मुले आजारी पडल्यानंतरही शाळा प्रशासनाकडून मुलांना वैद्यकीय तपासणी केली जात नव्हती यामुळे आपल्या व्यथा आपल्या पालकांना सांगितल्या होत्या.
मुलांच्या तक्रारीनंतर पालकांनी शाळा प्रशासनाच्या संस्थाचालकांना मीटिंगमध्ये सर्व बाबी आढळून दिल्यानंतर तोच राग मनात धरून संस्था चालकांनी विद्यार्थ्यांना जबर मारहाणीची घटना घडली आहे. जवळपास 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी शाळेच्या गलथान कारभाराबद्दल तक्रार केली आहे. या घटनेनंतर पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठून संस्था चालकावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
बराच वेळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेण्याचे काम सुरू होते, या बरोबरच विद्यार्थ्यांना किडे असलेले जेवण दिले जात होते अशीही माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. त्यामुळे पालकांच्या मध्ये आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. याबाबत संस्थाचालक मोहन माळी यांच्याशी दूरध्वनी वारे संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.. कवठेमंकाळ पोलीस ठाण्यासमोर तक्रार देण्यासाठी पालकांनी गर्दी केली आहे.